महेश कोठारेंची नात कबुतरासोबत मारतेय गप्पा; जीजाचे निरागस प्रश्न ऐकून तुम्हीही कराल कौतुक: VIDEO
जीजाचा (Jiza) कबुतराशी गप्पा मारतानाचा एक व्हिडीओ आदिनाथ कोठारेने (Adinath Kothare) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने विचारलेले निरागस प्रश्न ऐकून तुम्ही म्हणाल सो क्यूट
मुंबई, 18 नोव्हेंबर: लहान मुलं अगदी निरागस असतात. त्यांची कोणाशीही पटकन मैत्री होते. महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या नातीचा असाच एक क्यूट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जीजा (Jiza) कबुतराला खायला देताना दिसत आहे. हा व्हिडीओ आदिनाथ कोठारेने (Adinath Kothare) सोशल मीडियावरुन शेअर केला होता.
आदिनाथने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती कबुतराशी गप्पा मारतेय. 'तुला शिजलेला भात देऊ का? तू अजून काय खाणार?' असे प्रश्न जीजा कबुतराला विचारत आहे. तिचा निरागसपणा पाहून तिचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. आदिनाथही तिच्यासोबत गप्पा मारत आहे. आदिनाथला वेगवेगळे प्रश्न विचारून ती भंडावून सोडत आहे. 'कबुतराला बोलता का येत नाही? त्याचं तोंड कुठे आहे?' असे एक ना अनेक प्रश्न ती या व्हिडीओमध्ये विचारते.
आदिनाथने शेअर केलेल्या या व्हिडीओ आत्तापर्यंत अनेक व्ह्यूज आले आहेत. मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारही आदिनाथ आणि उर्मिलाच्या लेकीचं कौतुक करत आहेत. जीजाचे अनेक गोड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kanetkar Kothare) जीजाचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चिमुरड्या जीजाचाही वेगळा चाहतावर्ग आहे. तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर भरपूर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात.