मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रियांका चोप्रानं 'पाणी'चं स्क्रीप्ट वाचलं आणि निर्मिती करायचं ठरवलं - आदिनाथ कोठारे

प्रियांका चोप्रानं 'पाणी'चं स्क्रीप्ट वाचलं आणि निर्मिती करायचं ठरवलं - आदिनाथ कोठारे

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या बिझी आहे सिनेमाच्या शूटिंगमध्ये. अर्थात, आता त्याची ओळख फक्त अभिनेता म्हणून नाही, तर दिग्दर्शक म्हणून आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या बिझी आहे सिनेमाच्या शूटिंगमध्ये. अर्थात, आता त्याची ओळख फक्त अभिनेता म्हणून नाही, तर दिग्दर्शक म्हणून आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या बिझी आहे सिनेमाच्या शूटिंगमध्ये. अर्थात, आता त्याची ओळख फक्त अभिनेता म्हणून नाही, तर दिग्दर्शक म्हणून आहे.

    मुंबई, 16 आॅक्टोबर : अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या बिझी आहे सिनेमाच्या शूटिंगमध्ये. अर्थात, आता त्याची ओळख फक्त अभिनेता म्हणून नाही, तर दिग्दर्शक म्हणून आहे. पाणी सिनेमाचं दिग्दर्शन तो करतोय आणि त्याची निर्मिती करतेय प्रियांका चोप्रा.

    सिनेमाबद्दल फार काही बोलायला आदिनाथ अजिबात तयार नव्हता. तरीही त्यानं काही गोष्टी आमच्याशी शेअर केल्या. आदिनाथ म्हणाला, ' नितीन दीक्षितनं हा सिनेमा लिहिलाय. अर्जुन सोरटे डीओपी आहे तर विठुमाऊली मालिकेचं टायटल ट्रॅक करणारा सिनेमाला संगीत देतोय.'

    सिनेमाबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला, 'गेली पाच वर्ष मी यावर काम करतोय. खूप संशोधन करून पटकथा लिहिलीय. पाणीप्रश्नाची पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा सत्य घटनेवर आहे.'

    ' नांदेडमधल्या एका गावाची ही गोष्ट आहे. त्या गावात राहणारे हनुमंत केंद्रे यांनी गावात पाणी कसं आणलं यावर हा सिनेमा बेतलाय.प्रेरणादायी कथा आहे.' आदिनाथ सिनेमाबद्दल सांगताना कलाकार कोण हे मात्र सांगत नव्हताच.

    ही कथा प्रियांका चोप्रापर्यंत कशी पोचली? याबद्दल सांगताना आदिनाथ म्हणाला, 'आम्ही स्क्रीप्ट तयार केली. रश्मी कुलकर्णी ही प्रियांकाची क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे. तिला ती वाचून दाखवली. मग मधू चोप्रांनी ही स्क्रीप्ट ऐकली. त्यांनाही आवडली आणि शेवटी प्रियांका चोप्रानं ऐकली. त्यांनाही आवडली.'

    एवढी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी असूनही इतका वेळ काढल्याबद्दल आदिनाथला खूपच भारी वाटतंय. दिग्दर्शक महेश कोठारेंचा नेहमीच आपल्याला पाठिंबा असल्याचं आदिनाथनं सांगितलं. ते नेहमीच आपल्या मागे उभे असतात,असंही तो म्हणाला.

    आदिनाथही आता बाबा झालाय. त्याची घरातली भूमिकाही बदललीय. ' मजा येतेय. ती नवं काही शिकत असते. चालायला शिकतेय. बोलायला शिकते. ती जशी वाढतेय, तसा मीही बाबा म्हणून वाढतोय.'

    या सिनेमाव्यतिरिक्त आदिनाथ माधुरी दीक्षितनं निर्मिती केलेला सिनेमा '15 आॅगस्ट'मध्येही काम करतोय. तोही आता रिलीजसाठी सज्ज आहे. बाॅलिवूड अभिनेत्री मराठी सिनेमाकडे वळतायत आणि आपल्या मराठी कलाकारांबरोबर काम करतायत, हीसुद्धा अभिमानाची गोष्ट आहे.

    करिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता!

    First published:
    top videos

      Tags: Adinath kothare, Director, Pani, Priyanka chopra