जेव्हा आदेश भाऊजी गाणं म्हणतात...

जेव्हा आदेश भाऊजी गाणं म्हणतात...

आदेश बांदेकर यांच्या आयुष्यात म्युझिकला खूप महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर झिंग झिंग झिंगाटचं शीर्षक गीत देखील त्यांनी गायलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : ताक धीना धिन नंतर चक्क १५ वर्षांनी 'झिंग झिंग झिंगाट' या नव्या कार्यक्रमातून आदेश बांदेकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रामुळे घरोघरी जाऊन अनेक कुटुंबाना भेटणारे आदेश बांदेकर झिंग झिंग झिंगाट या कार्यक्रमाद्वारे रक्ताची नाती नसलेल्या कुटुंबांना भेटतात.

आदेश बांदेकर यांच्या आयुष्यात म्युझिकला खूप महत्त्व आहे. इतकंच नव्हे तर झिंग झिंग झिंगाटचं शीर्षक गीत देखील त्यांनी गायलं आहे. आदेश बांदेकर यांच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. त्याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, 'कमलेश भडकमकर यांनी या टायटल साँगला म्युझिक दिलं आहे. मी याआधी कधी असं काही गायलं नाही. पिकनिकला गाणी म्हणणं आणि शीर्षक गीत गाणं यामध्ये खूप फरक आहे. पण मी हे धाडस केलं आणि मला गाणं गाऊन खूप आनंद मिळाला.'

ते पुढे म्हणाले, 'कमलेश भडकमकर यांनी या टायटल साँगला म्युझिक दिलं आहे. मी याआधी कधी असं काही गायलं नाही आहे. पिकनिकला गाणी म्हणणं आणि शीर्षक गीत गाणं यामध्ये खूप फरक आहे. पण मी हे धाडस केलं आणि मला गाणं गाऊन खूप आनंद मिळाला.'

'ताक धीना धीन'नंतर १५ वर्षांनी आता झिंग झिंग झिंगाट या अंताक्षरीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कसं वाटतंय? काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या का? यावर ते म्हणाले, 'अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हा खरंच एक चांगला अनुभव आहे. ताक धीना धीननंतर खूप काळानंतर असा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे मी घरोघरी जातो आणि कुटुंबाना भेटतो पण झिंग झिंग झिंगाट या कार्यक्रमात रक्ताची नाती नसलेल्या कुटुंबांशी भेट होते.'

होम मिनिस्टरनंतर बऱ्याच वर्षांनी प्रेक्षक बांदेकरांना वेगळ्या रूपात पाहतायत, प्रेक्षक, चाहते आणि मित्रपरिवाराकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या? 'मला माझ्या चाहत्यांकडून खूप पॉसिटीव्ह रिस्पॉन्स मिळत आहे. १ तास प्रेक्षक झिंग झिंग झिंगाट हा कार्यक्रम पाहून रिलॅक्स होतात. या कार्यक्रमामुळे मराठी गाण्यांना उजाळा मिळतो आणि प्रेक्षक या गाण्याचा आनंद लुटतात. प्रेक्षकांकडून मला अशा अनेक प्रतिक्रिया मिळतात.' आदेश बांदेकर सांगतात.

आदेश बांदेकर सांगतात, गाणं ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक सिच्युएशनमध्ये फिट होते. आपण दु:खातही गाणी गातो आणि सुखातही. गाणी ऐकल्यावर माझा मूड रिफ्रेश होतो.

भाऊजी म्हटल की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पैठणीचा खेळ आणि भाऊजींचं औक्षण करणाऱ्या वाहिनी. भाऊजींनी त्यांच्या मिश्किल स्वभावाने या पैठणीच्या खेळात इतकी रंगत आणली की हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आता मात्र त्यांच्याबरोबर प्रेक्षकही झिंगाट होतात.


VIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 12:55 PM IST

ताज्या बातम्या