मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'...अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात', कंगनावर संतापले आदेश बांदेकर

'...अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात', कंगनावर संतापले आदेश बांदेकर

अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईबाततच्या वक्तव्यावरून मराठी कलाकार एकवटले आहेत. अभिनेता आदेश बांदेकरांनी देखील कंगनाला लक्ष्य केलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईबाततच्या वक्तव्यावरून मराठी कलाकार एकवटले आहेत. अभिनेता आदेश बांदेकरांनी देखील कंगनाला लक्ष्य केलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईबाततच्या वक्तव्यावरून मराठी कलाकार एकवटले आहेत. अभिनेता आदेश बांदेकरांनी देखील कंगनाला लक्ष्य केलं आहे.

मुंबई, 04 ऑगस्ट : अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मुंबईबाततच्या वक्तव्यावरून मराठी कलाकार एकवटले आहेत. अनेकांनी कंगनाचे नाव घेत तर काहींनी तिचे नाव न घेता कठोर शब्दात टीका केली आहे. कंगनाने तिच्या एका ट्वीटमधून देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूड कलाकार देखील कंगनावर टीका करताना पाहायला मिळाले.

अभिनेता आदेश बांदेकरांनी देखील कंगनाला लक्ष्य केलं आहे. त्यांनी ट्विटरवर असे लिहिले आहे की, 'मुंबई मध्ये येऊन राहतात, पैसा ,प्रसिद्धी मिळवतात आणि मुंबईचा अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात... निषेध आहे ह्या कृतघ्न वृत्तीचा...'

अभिनेत्री कंगना रणौतने संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) चर्चेत आली. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने एक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. तिने या ट्वीटमध्ये म्हटले होते की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?'

(हे वाचा-कंगनावर संतापले मराठी कलाकार, सोशल मीडियावरून केला टीकेचा भडिमार)

कंगनाच्या या वक्तव्यामुळे ती टीकेची धनी झाली आहे. रितेश देशमुख, सई ताम्हणकर, प्रिया बेर्डे यांसारख्या अनेक कलाकारांनी कंगनाचा निषेध केला आहे. 'मुंबई मेरी जान' असल्यची प्रतिक्रिया या कलाकारांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Kangana ranaut