VIDEO : ...अखेर कतरिनानं केलं सलमानला प्रपोज

VIDEO : ...अखेर कतरिनानं केलं सलमानला प्रपोज

काही दिवसांपूर्वी एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानने कतरिनानं त्याला भाईजान म्हणू नये असं सांगितलं होतं

  • Share this:

मुंबई, 25 मे : अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान सध्या त्यांचा आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण या प्रमोशन दरम्यान कतरिनाची मस्करी करण्याची एकही संधी सलमान खान सोडत नाही. काही दिवसांपूर्वी एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानने कतरिनानं त्याला भाईजान म्हणू नये असं सांगितलं होतं. त्यामुळे सलमानच्या मनात अद्यापही कतरिनाची खास जागा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये कतरिना सलमानला प्रपोज करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कतरिना कैफनं स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती सलमान खानला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी सिनेमा 'भारत'मधील एक सीन आहे. मात्र कतरिनाची प्रपोज करण्याची पद्धत पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. काही वर्षांपूर्वी सलमान आणि कतरिना रिलेशनशीपमध्ये होते मात्र कतरिनाच्या लाइफमध्ये रणबीर कपूर आल्यानं सलमान कतरिनामध्ये दुरावा आला. मात्र त्यांची मैत्री आजही तशीच टिकून आहे.

सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 'भारत' हा साउथ कोरियन 'ओड टू माय फादर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमामध्ये 1950 ते 2014 पर्यंतचा काळ एका सामान्य व्यक्तीच्या नजरेतून मांडण्यात आला होता आणि 'भारत'मध्येही काहीसं असंच दाखवण्यात आलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून एक सामान्य नागरिक ते नौदल अधिकारी असा प्रवास सलमान मोठ्या पडद्यावर साकारत आहे. 'भारत'मध्ये सलमानसोबत कतरिना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, तब्बू हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लाखो फॉलोअर्स असूनही दिशा पाटनीला वाटते या एकाच गोष्टीची खंत

India's Most Wanted च्या स्क्रिनिंगला अर्जुनच्या 'या' सावत्र बहिणीबरोबर वाढलं मलायकाचं बाँडिंग

मोदी सरकारनंतर आता ‘टर्मिनेटर’ही परतला, 64 लाख वेळा पाहिला गेला हा VIDEO

First published: May 25, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading