लीलावती रुग्णालयाच्या कारभारावर भडकली सलमानची ही अभिनेत्री, शेअर केला VIDEO

लीलावती रुग्णालयाच्या कारभारावर भडकली सलमानची ही अभिनेत्री, शेअर केला VIDEO

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan)पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लीलावती रुग्णालयाबात (Leelavati Hospital) नाराजी व्यक्त करणारा व्हिडीओ नुकताच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan)पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लीलावती रुग्णालयाबात (Leelavati Hospital) नाराजी व्यक्त करणारा व्हिडीओ नुकताच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने यामध्ये असे म्हटले आहे की ज्यांना आपण कोव्हिड-19 वॉरियर्स म्हणतो आहोत  ते जेव्हा आपल्याला त्यांची जास्त गरज असते तेव्हा ते साथ देत नाहीत. जरीनने अशी माहिती दिली की तिच्या आजोबांची तब्येत बिघडल्यावर त्यांना लीलावतीमध्ये नेण्यात आले. कोव्हिड-वॉर्डमध्ये  तिच्या आजोबांच्या शरीराचे तापमान नॉर्मल येऊन देखील जबरदस्तीने त्यांची कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगण्यात येत होते असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्री जरीन खान हिने नाराजीच्या सुरात एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

(हे वाचा-Drug Case: आज किंवा उद्या होणार श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची चौकशी- सूत्र)

जरीन खानने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेबाबतची माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. रात्री तिच्या आजोबांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना लीलावतीमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड-वॉर्डमध्ये सर्वांची चाचणी होत होती. तिचे आजोबा 87 वर्षांचे आहेत त्यांना अशा कोव्हिड वॉर्डमध्ये नेण्यास सांगण्यात आले यावरूनच तिने आश्चर्य व्यक्त केले. तिच्या मते त्यांना केवळ युरिने इन्फेक्शनचा त्रास होत होता. तिने असे सांगितले की त्यांना कोरोना होण्याचा कोणतीही शक्यता नव्हती. कारण लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ते घराबाहेर पडले होते. त्याठिकाणच्या अटेंडंटने त्यांना कोव्हिड-19 टेस्ट करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे अभिनेत्रीने अशी माहिती दिली की त्यांचे वागणे विचित्र होते.

जरीन खानने तिच्या व्हिडीओमध्ये पुढे असे म्हटले आहे की, 'मी केवळ माझ्या मित्रांकडून ऐकले आहे की काहीही झाले तरी या काळात रुग्णालयामध्ये जाऊ नका, त्यांनी हा व्यवसाय बनवून ठेवला आहे. त्यामुळेच मला वाटले की मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. माझे आजोबा इतके वृद्ध आहेत आणि त्यांना उपचाराची गरज आहे तरी देखील त्यांना समजले नाही. ज्यांना आपण कोव्हिड वॉरिअर्स म्हणतो आहोत पण जेव्हा त्यांची खरंच गरज आहे तेव्हा ते असा व्यवहार करत आहेत.' अभिनेत्रीने अशी माहिती दिली की शेवटी त्यांना तिच्या आजोबांना घरी आणावे लागले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 22, 2020, 11:32 AM IST

ताज्या बातम्या