Home /News /entertainment /

फक्त क्यूट आईच नाही तर लय भारी आत्याही आहे उर्मिला! बघा VIDEO

फक्त क्यूट आईच नाही तर लय भारी आत्याही आहे उर्मिला! बघा VIDEO

फक्त क्यूट आईच नाही तर लय भारी आत्याही आहे उर्मिला! बघा VIDEO

फक्त क्यूट आईच नाही तर लय भारी आत्याही आहे उर्मिला! बघा VIDEO

टेलिव्हिजनप्रमाणेच आता सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनं नुकताच आत्या भाची दिवस साजरा केलाय. पाहा तिनं भाचीबरोबर शेअर केलेला क्यूट व्हिडीओ.

  मुंबई, 23 जून: सोशल मीडियाच्या जगात जिनं आपली नवी ओळख निर्माण केली आहे ती अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) आता घराघरात ओळखली जाऊ लागली आहे. अभिनेत्री नंतरचा तिचा यूट्यूबर म्हणूनचा प्रवास आपण सर्वांना पाहिला आहे. उर्मिला नुकतीच आई झाली आहे. अथांग सारख्या गोड मुलाला तिनं जन्म दिला. सध्या घर आणि बाळ असं दोन्ही सांभाळून तिचं पॅशन जपताना दिसत असते. उर्मिला अथांगची फार काळजी घेताना दिसते. मात्र ती जितकी अथांगची क्यूट आणि फिट आई आहे तशीच ती तिच्या भाच्चीची म्हणजेच उन्मनीची ( Unmani Nimbalkar) लय भारी आत्याही आहे. उन्मनीवर ही उर्मिलाचा विशेष जीव आहे. परंतू अथांगच्या जन्मानंतर उर्मिला उन्मनीला फारसा वेळ देता आला नाही म्हणून उर्मिलानं तिला खास सप्राइज देत भाचीबरोबर क्वालिटी टाईम घालवला. उन्मनी निंबाळकर ही उर्मिलाचा भाऊ आयपीएस वैभव निंबाळकर (IPS Vaibhav Nimbalkar) ह्यांची मुलगी आहे.  उन्मनीला वेळ देऊ न शकल्यानं उर्मिलानं तिला खास सप्राइज दिलं. उन्मनीला मांजरी फार आवडतात त्यामुळे ती तिला घेऊन कॅट प्ले डेट स्वकायमध्ये घेऊन गेली आणि तिथं दोघींनी फार मज्जा केली. या दिवसाला उर्मिलानं 'आत्या भाची दिवस' असं नाव देत एक व्हिडिओ देखील शेअर केला. या व्हिडीओमध्ये उन्मनी मांजरींबरोबर धम्माल मस्ती करताना दिसतेय. हेही वाचा - ...आणि जळाले अभिनेत्रीच्या नाकातले केस! धम्माल VIDEO एकदा पाहाच
  उर्मिला व्हिडीओ शेअर करत फार मोलची पोस्ट लिहिली आहे. तिनं म्हटलं, 'माझ्या मते पैसे देणं एकवेळ सोपं आहे पण वेळ आणि कष्ट कठीण! आणि लहान मुलांना नेमकं तेच हवं असतं. तुमचं undivided attention with quality time. म्हणून तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या नात्यांची वैयक्तिक दखल घ्यावी लागते. Mentor प्रल्हाद दादा पै म्हणतात, “दखल न घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे”. मी आई झाल्यापासून माझं पहिलं लक्ष अथांग असल्याकारणाने, माझ्या गोंडस भाचीबरोबर मात्र मला quality time spend करतां येत नव्हता. उन्मनीला मांजरी भयंकर आवडतात. म्हणून शाळा सुरु होण्याआधी Cat play date Swakaya मध्ये बुक केली आणि आम्ही दोघींनी आत्त्या - भाची दिवस साजरा करुन लई मजा केली! उर्मिलाच्या व्हिडीओनंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युझरनं म्हटलंय, 'कसली भारी आत्या आहेस तू', तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, 'क्यूट उन्मनी तिची क्यूट आत्या आणि क्यूट मांजरी'. आत्या भाचीचं प्रेम पाहून दोघींवर सध्या प्रेमाचा वर्षाव होतोय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv actress, Tv celebrities

  पुढील बातम्या