धक्कादायक! या प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, काही दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री VJ चित्रा (VJ Chitra) हिने आत्महत्या केल्याची धक्कादयक घटना घडली आहे. या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्व पुन्हा हादरलं आहे.
चेन्नई, 09 डिसेंबर: मनोरंजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक घटना समोर येते आहे. अभिनेत्र VJ चित्रा (VJ Chitra) हिने आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात मोठ खळबळ उडाली आहे. अवघ्या 28 वर्षांच्या चित्राच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशी माहिती समोर येते आहे की चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. आश्चर्याची बाब म्हणजे तिचा काही दिवसांपूर्वी उद्योजक हेमंत रवि यांच्याशी साखरपुडा झाला होता. तिच्या होणाऱ्या नवऱ्याची देखील याबाबत चौकशी होणार असल्याची माहिती मिळते आहे. मीडिया अहवालानुसार चित्रा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरच राहत होती.
We miss you so much #VjChitra akka 😭😭😭😭 Can't believe that you are not with us 😪😔 Rest In Peace.. in soul. 😪😭 lots of prayers and support to your family and to your luvd ones... 😭😭😭😭😭 pic.twitter.com/WmAInDx72P
स्टार विजय चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या पांडियन स्टोअर्स (Pandiyan Stores) या तमिळ मालिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. यामध्ये ती मुल्लाई (Mullai) ही भूमिका करत आहे. चित्रा देखील नैराश्याचा बळी ठरल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चित्रा ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होती. याठिकाणी शूटिंग संपल्यानंतर ती रात्री अडीचच्या सुमारास हॉटेलमध्ये परतली. याठिकाणी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर ती राहत होती. पोलिसांना दिलेल्या एका जबाबात हेमंत यांनी असं म्हटलं आहे की, चित्राने त्यांना ती अंघोळीला जात असल्याचं म्हटलं. मात्र बराच काळासाठी ती परत आली नाही. तसंच दरवाजा ठोठावूनही तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा हेमंत यांनी हॉटेल स्टाफशी संपर्क केला आणि डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला, तेव्हा सीलिंगला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला.
अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर अद्याप तिच्या कुटुंबियांकडून किंवा मित्रपरिवाराकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे. मात्र यावर विश्वास ठेवणं अनेकांसाठी कठीण आहे की चित्रा आता या जगात नाही आहे.