मुंबई 11 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या हटके लुक्स साठी फारच प्रसिद्ध आहे. अनेकदा ती अगदी आगळ्या वेगळ्या रूपात दिसते. तर सध्या तिचा एक लुक चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात तिने संपूर्ण सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर अतिशय मोठे कानातले परिधान केले आहेत. तिचा हा लुक विशेष लक्ष वेधत आहे.
उर्वशी तिच्या मॉडेलिंग प्रोजेक्ट्स साठी एक शुट करत असताना तिने हा हटके लुक केला होता. दरम्यान 51 डिग्री सेल्सिअस तापमानात हे शुट केलं असल्याचं ही तिने म्हटलं आहे. दुबईत उर्वशी तिचे अनेक शुट करत असते. दरम्यान तिचा हा लुक पाहून तिच चाहते ही अचंबित होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अनेकदा महागडे कपडे, दागिणे, लुक्स यामुळे उर्वशी चर्चेत असते. आपल्या लुकवर ती विशेष लक्ष केंद्रित करते. तसेच नेहमी हटके दिसण्याचा ती प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक निरनिराळे लूक्स मधील फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात.
View this post on Instagram
उर्वशी ने एक मॉडेल म्हणून मोठी ओळख निर्माण केली आहे. ती दोन वेळा मिस इंडिया हा किताब जिंकली आहे. यो यो हनी सिंगच्या ‘लव्ह डोस’ (Love Dose) गाण्यात ती फीचर झाली होती. त्यातून तिला मोठी प्रसिद्धी ही मिळाली होती. (Urvashi Rautela expensive looks)
VIDEO: पतीच्या वाढदिवशी मयुरी देशमुखला भावना अनावर; वर्षभरापूर्वीच घेतला होता जगाचा निरोप
उर्वशी ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटांत तसेच अनेक म्युझिक व्हिडिओत काम केलं आहे. लवकरच ती दोन बिग बजेट साऊथ चित्रपटांत दिसणार आहे. याशिवाय काही वेब सीरिज मध्येही तिने काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.