मुंबई, 6 एप्रिल : अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) ही सध्या फारच चर्चेत आहे. उर्वशी सध्या अनेक प्रोजेक्ट्स वर काम करत आहे (Urvashi Rautela became most expensive tamil actress) . तर आता तामीळ सिनेसृष्टीत (Tamil industry) पदार्पण करत आहे. चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रपटात ती एका मायक्रोबायोलॉजिस्ट (microbiologist) आणि एक आयआयटीयन च्या भूमिकेत दिसणार आहे.
साउथ इंडस्ट्रीचा (south cinema) हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा एक बिग बजेट चित्रपट असून उर्वशीने चित्रपटासाठी भारीभक्कम असं मानधन घेतलं आहे. उर्वशीने चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतले आहेत. आणि त्यामुळेच उर्वशी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. चित्रपटाचं शूटींग हे मनालीत सुरू आहे. उर्वशी आणि अभिनेता सरवनन (sarvanan) यांना शूटींग दरम्यान एकत्र पाहण्यात आलं आहे. चित्रपटाचं आणखी बरसचं शूटींग हे बाकी असल्याचं सांगितलं जात आहे. याखेरीज उर्वशी तेलुगू चित्रपटात ही पदार्पण करत आहे. 'ब्लॅक रोज' (black rose) असं या चित्रपटाचं नाव असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
उर्वशीने अनेक बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांत काम केलं आहे. सनम रे (sanam re), ग्रेट ग्रँड मस्ती (great grand masti), वर्जीन भानूप्रिया, सिंग साब द ग्रेट याशिवाय अनेक म्युझिक अल्बम मध्ये ती झळकली होती.
राहुल वैद्य आणि दिशा परमारने गुपचूप लग्न केलं? पाहा VIRAL PHOTO मागील सत्य
लव डोस (love dose), बिजली की तार (bijli ki taar), गल बन गयी (gal ban gyi) अशा म्युझिक अल्बमने तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. तर काही बेबसिरीज मध्ये सुद्धा उर्वशीने काम केलं आहे. 'द डान्स प्रोजेक्ट' आणि अपकमिंग 'इन्स्पेक्टर अविनाश' इ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, South actress