मुंबई 10 जून: अभिनेत्री त्यांचा फिटनेस राखण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. योगा , जीम, पिलॅट्स, स्पोर्ट्स, डायट अशा अनेक प्रकारे स्वतःचा फिटनेस ठेवतात. पण अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) मागील काही दिवसांपासून बॉक्सिंग (Boxing) करत आहे. त्यामुळे उर्वशी फिटनेससाठी बॉक्सिंग शिकत आहे की चित्रपटासाठी असाही प्रश्न अनेकांना पडत आहे. त्याचही उत्तर तिने कॅप्शनमध्ये दिलं आहे. तिचा नवा व्हिडीओ सगळ्यांनांच अवाक् करणारा आहे.
उर्वशीने काही दिवसांपूर्वी बॉक्सिंगच्या व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. तर आता तिने चक्क पोटावर पंचेस मारून घेतले आहेत. तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओत तिचा ट्रेनर तिला पोटावर पंच करत आहे. काही पंच होईपर्यत उर्वशी हलली देखील नाही. त्यामुळे तिचे चाहतेही चकित झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. यावर तिने कॅप्शनही लिहिलं आहे. व हे सगळ्या नव्या अक्शन चित्रपटसाठी असल्याचंही तिने म्हटलं. पण कोणता चित्रपट ते तिने सांगितलं नाही.
View this post on Instagram
उर्वशी ही बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती स्वतःच्या लुकवर फार लक्ष देते. नेहमी तिचे जीम व्हिडीओ ती शेअर करत असते. तर आता ती बॉक्सिंगही शिकत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर उर्वशी खुप जास्त सक्रिय असते. तिच्या अनेक अपडेट्स ती शेअर करत करते, तसेच तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज, व्हिडीओजही ता शेअर करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना आवडतो.
मेहूल चोक्सीच्या घोटाळ्यावर येतोय चित्रपट? मधुर भांडारकर म्हणाले…
निरनिराळ्या कारणांसाठी उर्वशी चर्चेत असते. कधी तिच्या महागड्या ड्रेसेसमुळे तर कधी तिच्या लुक्समुळे. तर आता तिने काही काही रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सर्नट्रेटर्स दान करण्याचेही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर अनेकांनी तिच कौतुकही केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Fitness, Urvashi rautela