या व्हिडीओत उर्वशीने तिचा मेकअप क्लास ओपन केल्याच दिसत आहे व ती गुरु रांधवाचा मेकअप करत आहे. तेव्हा गुरु तिला मेकअप करण्यापासून अडवत असतो पण उर्वशी त्याचं न ऐकता मेकअप सुरु ठेवते. सध्या या व्हिडीओची नेटकरी फारच चर्चा करताना दिसत आहेत. तर यावर त्यांना अनेक मजेशीर कमेंट्सही मिळाल्या आहेत.View this post on Instagram
उर्वशी आणि गुरु यांचा ‘डूब गये’ (Doob gaye) हा म्युझिक व्हिडीओ लकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून उर्वशी आणि गुरु याविषयी फोटो पोस्ट करत आहेत. सुरुवातीला उर्वशीने गुरु सोबत एक फोटो पोस्ट केला होता तर हार्ट इमोजी कॅप्शन दिलं होतंच त्यामुळे उर्वशी आणि गुरुच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर हा एक प्रमोशनल स्टंट असल्याचं समोर आलं.View this post on Instagram
संकेत-सुगंधाच्या घरी लगीनघाई; पाहा मेहंदी सोहळ्याचे खास क्षण
याशिवाय उर्वशी लवकरच एका साउथ चित्रपटातही झळकणार आहे. ‘लव डोस’ (Love Dose), ‘गल बन गयी’, ‘बिजली की तार’, ‘एक लडकी भीगी भागीसी’ या ही म्युझिक अल्बम्स मध्येही ती दिसली होती.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Urvashi rautela