Home /News /entertainment /

स्वरा भास्करने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

स्वरा भास्करने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)ने रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) पाठिंबा दिला आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)ने रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) पाठिंबा दिला आहे. सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे. त्यांनी याप्रकरणी पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केली होती.  रियाने सोमवारी सोमवारी 'अनफेअर मीडिया ट्रायल'च्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. मीडियामध्ये सातत्याने सनसनाटीकरण सुरू असल्यामुळे तिला याचा खूप त्रास होत असल्याचा आणि तिच्या गोपनीयतेच्या हक्कांंचे उल्लंघन होत असल्याचे तिने यात म्हटले आहे. दरम्यान यासंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्कर रियाच्या पाठिंब्यासाठी उभी राहिली आहे. ट्विटरवर तिने याबाबत तिचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान यानंतर मात्र स्वराला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे. दरम्यान स्वराने तिच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की रियाबरोबर प्रचंड खतरनाक आणि विचित्र मीडिया ट्रायल होत आहे ज्यावर मॉब जस्टिसचा प्रभाव आहे. सु्प्रीम कोर्टाने याकडे लक्ष घालण्याची विनंती स्वराने केली आहे. मात्र यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. (हे वाचा-मोठी बातमी! सुशांतची सिंह राजपूतची आत्महत्याच? फॉरेन्सिक अहवाल आला समोर) सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर पाटणामध्ये दाखल केली होती. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी या एफआयआरमध्ये केला होता. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांच्या पथकानेही मुंबई गाठली. आता हे प्रकरण सीबीआयकडे आहे. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या अँगलने चौकशी करत आहे. आज रियाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होत आहे. रियाने सुप्रीम कोर्टात अशी याचिका दाखल केली होती की, बिहार पोलिसात तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर मुंबईमध्ये ट्रान्सफर केली जावी.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या