'ही' अभिनेत्री करतेय स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडलला डेट, लग्नाआधीच आहे 2 मुलींची आई

'ही' अभिनेत्री करतेय स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडलला डेट, लग्नाआधीच आहे 2 मुलींची आई

स्वतःहून 15 वर्षांनी लहान असणाऱ्या मॉडेलला डेट करणारी ही अभिनेत्री लग्नाधीच 2 मुलींची आई आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी :  मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत.  मागच्या काही काळापासून ती बॉलिवूडपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय आहे. याशिवाय ती सतत काही ना काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असते. यातील सर्वात चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे तिचं रिलेशनशिप. सध्या ही अभिनेत्री  तिच्याहून 15 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे पण त्याआधी तिचं नाव अनेक अभिनेत्यांशीही जोडलं गेलं होतं.

बॉलिवूडची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे सुश्मिता सेन. सुश्मितानं अद्याप लग्न केलेलं नाही. पण असं असताना ती दोन मुलींची आई आहे. तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल एक मॉडेल असून तो तिच्याहून 15 वर्षांनी लहान आहे. रोहमन आणि सुश्मिताची ओळख इन्स्टाग्रामवरुन झाली होती. नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. सुश्मिता नेहमीच रोहमनसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र रोहमनच्या आधीही सुश्मिताचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. एक वेळ होती जेव्हा सुश्मिताचं नाव तिच्याहून विक्रम भट्टसोबत जोडलं गेलं होतं. त्यावेळी सुश्मिता अवघ्या 20 वर्षांची होती. याशिवाय तिचं नाव रणदीप हुड्डासोबतही जोडलं गेलं होतं.

 

View this post on Instagram

 

#love

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

विक्रम भट्ट आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबतची सुश्मिताची अफेअर खूप गाजली मात्र याव्यतिरिक्त ऋतिक भसीन, बंटी सजदेह, संजय नारंग, शबीर भाटिया, इम्तियाज खत्री, मुदस्सर अजीज, वसीम अकरम आणि मानव मेनन यांच्यासोबतही सुश्मिताचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र यावर सुश्मितानं कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सुश्मिता सेननं अद्याप लग्न केलेलं नाही पण लवकरच ती रोहमन शॉलसोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. सुश्मिता सिंगल मदर आहे आणि तीला दोन मुली आहे. सुश्मिताच्या मुलींची नावं रेनी आणि अलिषा अशी आहेत. या दोन्ही मुलींना सुश्मितानं दत्तक घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी सुश्मितानं तिच्या मुलींना तिनं त्यांना दत्तक घेतल्याचं सांगितल्यामुळे चर्चेत आली होती.

काही दिवसांपूर्वी सुश्मिताच्या भावाचं लग्न झालं यावेळी रोहमन त्या सर्व फंक्शनमध्ये दिसला होता. लग्नाच्या प्रत्येक फॅमिली फोटोमध्ये तो सुश्मितासोबत दिसला. त्यामुळे तो सुश्मिताच्या फॅमिलीच्या किती जवळ आहे हे दिसून येतं. याशिवाय सुश्मिताच्या दोन मुली आहेत. ज्यांना तिनं दत्तक घेतलं आहे. या दोघांशीही रोहमन खूप स्पेशल बॉन्डिंग शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं मात्र या दोघांनीही या सर्व अफवा असल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 08:24 AM IST

ताज्या बातम्या