• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सनीला पतीकडून मिळालं हे महागडं गिफ्ट; शेअर केला फोटो

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सनीला पतीकडून मिळालं हे महागडं गिफ्ट; शेअर केला फोटो

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) नुकत्याच तिनं मुंबईत घेतलेल्या तब्बल 16 कोटी रुपये किंमतीच्या अलिशान घरामुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यापाठोपाठ तिच्या पतीनं लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त तिला दिलेल्या अतिशय सुंदर आणि महागड्या गिफ्टमुळेही पुन्हा एकदा सोशल मीडियावर सनीचीच चर्चा आहे.

  • Share this:
मुंबई, 10 एप्रिल : बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) नुकत्याच तिनं मुंबईत घेतलेल्या तब्बल 16 कोटी रुपये किंमतीच्या अलिशान घरामुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यापाठोपाठ तिच्या पतीनं लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त तिला दिलेल्या अतिशय सुंदर आणि महागड्या गिफ्टमुळेही पुन्हा एकदा सोशल मीडियावर सनीचीच चर्चा आहे. 9 एप्रिल रोजी सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर (Daniel Weber) यांच्या लग्नाला दहा वर्षे (10th Wedding Anniversary) पूर्ण झाली. त्यानिमित्त डॅनियलनं तिला एक असं गिफ्ट दिलं आहे, जे बघून सनीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांना या गिफ्टबाबत सांगितलं असून, आपल्या पतीबद्दल भावूक पोस्टही लिहिली आहे. लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त डॅनियल वेबर यानं सनीला एक अतिशय महागडा असा हिऱ्यांचा हार (Diamond Necklace)भेट दिला आहे. हा हिऱ्यांचा लखलखता हार घालून तिनं एक व्हिडीओ शेअर केला असून, डॅनियलसाठी एक खास पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सनीनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,‘आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर हिऱ्यांचा वर्षाव केल्याबद्दल धन्यवाद. एक स्वप्न पूर्ण झालं आहे. लग्नाची दहा वर्षे आणि आपण एकत्र असण्याची 13 वर्षे असं एकत्रित आयुष्य घालवताना एका सुंदर स्वप्नाचा विचार करता करता आपण इथपर्यंत पोहोचू असा विचारही केला नव्हता.’. सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांनी 9 एप्रिल 2011 मध्ये लग्न केलं. त्यांना अशर, नूह आणि निशा अशी तीन मुलं आहेत.

(वाचा - सनी लिओनी राहणार मुंबईत; खरेदी केलं 16 कोटींचं आलिशान घर)

सनीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनीही तिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असून, आतापर्यत सात लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका युजरनं, तू आणि तुझा हार खूपच सुंदर आहात असं म्हटलं आहे, तर एकाने लिहिले आहे की, देव तुमचं कल्याण करो. तुम्ही नेहमी एकत्र रहा.
View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. सनी नेहमीच अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आपली मुलं आणि पती यांच्या बरोबरचे फोटोही ती शेअर करत असते. जगभरात तिचे लाखो, करोडो चाहते असून तिच्या फोटो, व्हिडीओजना प्रचंड प्रतिसाद देत असतात.
First published: