Home /News /entertainment /

'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली!' अभिनेत्री स्पृहा सांगितेय वारीचा अद्भुत अनुभव

'काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली!' अभिनेत्री स्पृहा सांगितेय वारीचा अद्भुत अनुभव

अनेक जण लाखोंच्या संख्येनं पंढरपूरच्या वारीच सहभागी होत असतात. मात्र भक्तीमय अनुभूती फार कमी जणांना येते. अभिनेत्री स्पृहाला ही अनुभूती अनुभवता आल्यानं तिनं तिचा आनंद आणि अनुभव शेअर केला आहे.

  मुंबई, 28 जून: कोरोना महामारीनंतर तब्बल 2 वर्षांनी पांडूरंगाच्या पंढरीत पुन्हा एकदा हरीनामाचा गरज ऐकू आला. पंढरपूच्या वारीचं ( Pandharpur Vari) आणि पालखीचं दर्शन भक्तांना घेता आलं. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी हळू हळू पंढरपूरात दाखल होत आहेत. अनेक मराठी कलाकारांनीही वारीला हजेरी लावली आहे. अभिनेता संदीप पाठक ( Sandeep Pathak) अश्विनी महांगडे ( Ashwini Mahangade) करिश्मा कुलकर्णी नंतर अभिनेत्री कवयित्री स्पृहा जोशीनं ( Spruha Joshi) देखील वारीत सहभागी झाली होती. वारी आणि पालखीचा अद्भुत अनुभव स्पृहाला मोठी अनुभूती देऊन गेली. स्पृहानं तिचा वारीचा अद्भुत अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्पृहा नुकतीच पुण्यातील आषाढी वारीमध्ये सहभागी झाली होती. स्पृहा सध्या सुर नवा ध्यास नवा ( Sur Nava Dhyas Nava) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून शुटींगनिमित्त तिनं वारीचा आणि पालखीचा अनुभव घेतला. वारीत सहभागी होणाऱ्या लोकांशी तिनं गप्पा मारल्या त्यांचे अनुभव ऐकले. हा सगळा सुखद अनुभव स्पृहानं शब्दांच्या रुपात व्यक्त केला. त्याचप्रमाणे एक सुंदर व्हिडीओ  देखील तिनं शेअर केला.
  View this post on Instagram

  A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

  हेही वाचा - श्वेताच्या साडीचं 'लागीर झालं जी'च्या जीजींशी आहे खास कनेक्शन, शेअर केली भावूक पोस्ट स्पृहा वारीचा अद्भुत अनुभव सांगताना म्हणाली,  'आयुष्यात पहिल्यांदाच वारीचं, पालखीचं वातावरण अनुभवायची संधी मिळाली. पूर्ण वेळ मी आसपासच्या हरीभक्तीत लीन झालेले चेहरे नुसती बघत राहिले होते. ओढ, समर्पण, असोशी, तळमळ सगळे कागदावरचे शब्द, काल त्या शब्दांची माणसं होताना पाहिली.  पांडुरंग हरी! स्पृहाची पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष घेत आहे.  अनेक जण लाखोंच्या संख्येनं पंढरपूरच्या वारीच सहभागी होत असतात. मात्र अशी भक्तीमय अनुभूती फार कमी जणांना येते. स्पृहाला ही अनुभूती अनुभवता आल्यानं तिनं तिचा आनंद व्यक्त केला आहे. स्पृहा सध्या सूर नवा ध्यास नवाच्या नव्या पर्वात पुन्हा एखदा निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कार्यक्रामाचं ऑडिशन सुरू असून लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना कार्यक्रम पाहता येणार आहे. या पर्वातही गायक महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक म्हणून आपल्याला दिसणार आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Instagram post, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या