अभिनेत्रीनं शिक्षकालाच शिकवला धडा; दररोज पाठवत होता अश्लील मेसेज

अभिनेत्रीनं शिक्षकालाच शिकवला धडा; दररोज पाठवत होता अश्लील मेसेज

एका कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाने (Professor) अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण सौंदर्याने त्याला सडेतोड उत्तर देत त्याचं थोबाड बंद केलं आहे.

  • Share this:

मुंबई  17 मे: सोशल मीडिया हा जसा फायद्याचा आहे तसाच तो अनेकदा डोकेदुखीही ठरतो. आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या या माध्यमांवर अनेकदा सेलिब्रिटी, क्रिकेटर, कलाकार, उद्योजक, प्रसिद्ध व्यक्ती यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तसंच अभिनेत्रींना अश्लील भाषेतील प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. त्यात त्यांचं दिसणं, कपडे घालणं, फिगर, एखाद्या घटनेबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका याबद्दल विचित्र आणि अश्लील मतं मांडली जातात.

हिंदी, मराठी आणि देशातल्या सर्वच चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना याचा अनुभव येतो. टॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री आणि गायिका सौंदर्या(Singer Soundarya)हिला नुकताच असाच अनुभव आला. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मदुराईतील एका कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाने (Professor) अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण सौंदर्याने त्याला सडेतोड उत्तर देत त्याचं थोबाड बंद केलं आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम मीरा आहे fitness freak; पाहा मोमोच्या मादक अदा

सौंदर्याने त्या प्राध्यापकाच्या इन्स्टाग्राम पोस्ट सर्वांसमोर उघड करत त्याला तिथंच चांगली पट्टी पढवली. त्यानंतर त्याचं अकाउंट सौंदर्याने ब्लॉकही(Account Block)करून टाकलं. त्यामुळे त्या प्राध्यापकाचं बोलणं बंद झालं. याबाबत सौंदर्या म्हणाली,‘त्या प्रोफाइलवरून असं दिसतंय की तो माणूस मदुराईतील(Madurai)एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. एखादा प्रोफेसर एका स्रीशी अशा भाषेत कसं बोलू शकतो?ही गोष्ट फारच लाजिरवाणी आहे. मला याची जास्त चिंता वाटते की हा प्रोफेसर ज्या कॉलेजात शिकवत असेल तिथल्या मुलींना सुरक्षित वाटत असेल का?’

होता आशियातील सर्वात Sexy Man; पाहा हर्षद चोपडा सध्या काय करतोय?

खरोखर सौंदर्याने उपस्थित केलेला प्रश्न सगळ्या समाजाला विचारता येईल असाच आहे. कारण एखाद्या कॉलेजमधील प्राध्यापकच असं वर्तन करत असेल तर त्या कॉलेजमधील विद्यार्थिनींना त्यांच्या तासाला बसताना सुरक्षित वाटणं शक्य नाही. तसंच जर हे सत्य असेल तर त्या कॉलेजनेही याची दखल घेऊन त्या प्राध्यापकावर कारवाई करायला हवी.

दरम्यान सोशल मीडियावर इतर नेटकऱ्यांनी सौंदर्याच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. चांगल्या गोष्टीत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असंही अनेकांनी सौंदर्याला सांगितलं आहे. सोशल मीडियावरील या प्रकारामुळे सौंदर्या खूपच व्यथित झाली आहे. सोशल मीडियावर बेफाम वक्तव्य करणाऱ्यांची कमी नाही. अनेकदा तीव्यकी कोण आहे हेही जाणून न घेता लोकं केवळ ती स्री आहे हे बघून तिच्या फोटोंवर, कपड्यांवर, तिनी व्यक्त केलेल्या मतांवर बिनधास्त अश्लील प्रतिक्रिया देतात. याला आळा घालण्यासाठी पोलिसांचा सायबर क्राइम विभाग कार्यरत असतो. सेलिब्रिटींच्या अकाउटंवर तर त्यांचं लक्ष असतंच पण सामान्य घरातील सुंदर दिसणाऱ्या मुलींना व विवाहित स्रियांनाही अशा घाणेरड्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो.सौंदर्याच्या या कृत्याने त्या महिलांनाही अशा नेट युझर्सना धडा शिकवण्याचं बळ मिळेल.

First published: May 17, 2021, 4:11 PM IST

ताज्या बातम्या