अनेक वर्षांपासून सोनम कपूर करतेय या समस्येशी सामना, VIDEO शेअर करत व्यक्त केल्या वेदना

अनेक वर्षांपासून सोनम कपूर करतेय या समस्येशी सामना, VIDEO शेअर करत व्यक्त केल्या वेदना

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल देखील झाली आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या वेदना व्यक्त केल्या आहेत

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल देखील झाली आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. सोनम कपूर गेल्या काही वर्षांपासून एका विकाराचा सामना करत आहे. दरम्यान त्यापासून सुटका कशी मिळवावी आणि कोणते उपाय करावेत याबाबत तिने काही टिप्स शेअर केल्या आहेत. 'Storytime With Sonam' या सदरातील पहिला व्हिडीओ सोनम कपूरने शेअर केला आहे.

सोनम कपूर गेले अनेक वर्ष पीसीओएस अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (Polycystic Ovary Syndrome)चा सामना करत आहे. देशातील अनेक महिलांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या व्हिडीओमध्ये सोनमने सांगितले आहे की ती देखील पीसीओएसचा सामना करत आहे.

पीसीओएसबद्दल बोलताना सोनम असे म्हणाले की, यामध्ये प्रत्येक प्रकरणात लक्षणं आणि संघर्ष वेगवेगळा असतो. योग्य आहार, वर्कआऊट आणि दिनचर्येचा प्रयत्न केल्यास मदत मिळते का याबाबत मी माहित करून घेतले आहे. असे तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. अभिनेत्रीने यावरील काही उपाय शेअर केले आहेत. या प्रकरणात तिने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे देखील सुचवले आहे.

View this post on Instagram

Hi guys, going to share something personal here. I've been struggling with PCOS (Polycystic Ovary Syndrome) for quite some time now. PCOS, or PCOD, is a very common condition that a lot of women live with. It’s also an extremely confusing condition since everyone’s cases, symptoms and struggles are different. I've finally figured out what helps me after years of trying several diets, workouts and routines, and I want to share my tips for managing PCOS with you! Having said that, PCOS manifests in different ways, and I urge you to visit a doctor before you self-medicate or self-prescribe. Do you have any other PCOS hacks and tips? Let me know what helps you in the comments! #PCOS#PCOD#StoryTimeWithSonam #LivingWithPCOS

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

तिने असे म्हटले आहे की, ती गेली अनेक वर्ष पीसीओडी किंवा पीसीओएसशी संघर्ष करत आहे. 14 किवां 15 वर्षांची असल्यापासून या विकाराचा तिला सामना करावा लागला. टिप्समध्ये तिने असे म्हटले की, यासाठी व्यायाम आणि योगा किती आवश्यक आहे. त्याचबरोबर पीसीओडीसाठी साखर किती धोकादायक आहे, याबाबतही तिने माहिती दिली. साखरेचे सेवन करणे बंद केल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या बदलाबाबत देखील तिने भाष्य केले.

(हे वाचा-अभिनेत्रीने व्यक्त केली तिच्या हत्येची शंका,म्हणाली-मी छताला लटकलेली आढळले तर...)

पीसीओएस ही महिलांना होणारी एक समस्या आहे. काही महिलांना याबाबत माहिती नसते. असंतुलित हॉर्मोन्समुळे ही समस्या उद्भवते. मासिक पाळी अनियमित झाल्यास देखील ही समस्या उद्भवते, ज्यामुळे महिलांसाठी गर्भधारणा कठीण होऊन जाते. मात्र योग्य काळजी घेतल्यास पीसीओएसवर उपाय शक्य आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 25, 2020, 10:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading