Home /News /entertainment /

Dance Maharashtra Dance: जज की पाहुणी? Sonali Bendre च्या नव्या पोस्टने चाहते गोंधळात

Dance Maharashtra Dance: जज की पाहुणी? Sonali Bendre च्या नव्या पोस्टने चाहते गोंधळात

सोनाली एका मोठ्या ब्रेकनंतर करिअरमध्ये अनेक टप्पे पार करताना आणि कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

  मुंबई 06 ऑगस्ट: झी मराठीवर नुकताच सुरु झालेला एक नवा डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स सध्या प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसत आहे. अवघ्या एकाच आठवड्यात कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक चिमुकले स्पर्धक कार्यक्रमात रंगत आणताना दिसत आहेत. येत्या काळात या कार्यक्रमाच्या मंचावर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे अवतरणार असल्याचं समजत आहे. पण सोनाली नेमकी पाहुणी म्हणून येणार आहे की एक नवीन परीक्षक म्हणून तिची एंट्री होणार याबाबत गोंधळ उडालेला दिसत आहे. सोनाली बेंद्रे हा मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये गाजताना दिसत आहे. कॅन्सरशी असलेली झुंज यशस्वीपणे पारपडल्यावर सोनालीने पुन्हा एकदा कमबॅक केल्याचं दिसून आलं आहे. सोनालीने खास या कार्यक्रमात येणार असल्याची खबर देत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे ज्यामुळे चाहते गोंधळात पडताना दिसत आहेत. ती असं लिहिते, “मी हे लाईट्स खूप मिस केले, मी ही जागा खूप मिस केली, मी हा सेट खूप मिस केला. पुन्हा एकदा परतल्यावर खूप छान वाटतंय. यावेळी डान्स महाराष्ट्र डान्समध्ये… DID ची खूप आठवण आली. DID लवकरच सुरु व्हावं अशी आशा.” सोनालीच्या या पोस्टनंतर डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर अजून एका परीक्षकाची एंट्री होणार का असा प्रश्न समोर येताना दिसत आहे. तर झी मराठीने सादर केलेल्या नव्या प्रोमोवर सुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. या नव्या प्रोमोमध्ये सोनाली चेटकिणीसोबत पिंगा करताना आणि एकूणच धमाल करताना दिसणार आहे. चेटकीण सोनालीला माहेरवाशीण असं संबोधून तिचं स्वागत करताना दिसत आहे. तसंच सोनाली डान्स परफॉर्मंसवर दाद देताना सुद्धा दिसून आली आहे. एकूणच हे नेमकं रहस्य काय आहे हे समोर आलेलं नाही. सोनालीने याआधी डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर पर्वाचं परीक्षण केलं आहे. तब्बल अनेक वर्षांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने टीव्हीवर पदार्पण केलं. तसंच आता ती डान्स महाराष्ट्र डान्समध्ये सुद्धा दिसून येणार आहे.
  सोनालीने कॅन्सरला यशस्वीपणे मात देत पुन्हा एकदा आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. ती मागच्या काळात ब्रोकन न्यूज नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसून आली.
  पत्रकारिता जगतातील घडामोडींवर आधारित ही वेबसिरीज होती. हळूहळू सोनाली कामाचा वेग वाढवताना आणि जोमाने काम करताना दिसत आहे. तिला एका नव्या रूपात भेटायला चाहते उत्सुक आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या