Home /News /entertainment /

‘खपवून घेतलं जाणार नाही’ सोनाली भडकली! लग्नाच्या पोस्टवर ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावलं

‘खपवून घेतलं जाणार नाही’ सोनाली भडकली! लग्नाच्या पोस्टवर ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावलं

कुणाल बेनोडेकर या लंडनमधल्या व्यावसायिकाशी सोनालीने 7 मे रोजी लग्नगाठ बांधली.

कुणाल बेनोडेकर या लंडनमधल्या व्यावसायिकाशी सोनालीने 7 मे रोजी लग्नगाठ बांधली.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. पण काही युझर्सनी लग्नांच्या काहीच क्षणानंतर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यावर सोनालीनेही त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे.

  मुंबई 20 मे : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तर तिच्या चाहत्यांकडून, प्रिय जनांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण काही युझर्सनी लग्नाच्या पोस्टनंतर काहीच क्षणानंतर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यावर सोनालीनेही त्यांना जोरदार उत्तर दिलं आहे. सध्या सेलिब्रिटींना ट्रोल करणं, त्यांच्यावर अवाच्छ भाषेत कमेंट्स करणं हे प्रकार खूप वाढले आहेत. अनेक सेलिब्रिटी याकडे दुर्लक्ष करतात पण काहींनी आता सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. यातच सोनालीनेही विनाकारण केल्या जाणाऱ्या टिके वर आता उत्तर दिलं आहे.

  ती सध्या कुठे मिळते? अंकुश चौधरीचा कोरोनावर येतोय नवा चित्रपट?

  सोनालीच्या ट्विटर अकाउंटवर तिला अनेक कमेंट्स आल्या तर त्यातील काही या विनाकारण वैयक्तिक बाबींत नाक खुपसणाऱ्या आणि टीका करणाऱ्या होत्या. त्यात एका युझरने केलेल्या टिकेवर सोनालीने लिहिलं, ‘तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता...हे आता खपवून घेणार नाही. किमान मी तरी नाही. समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, ज़बाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे... हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अश्या फुकट comments टाकायच्या.’ यानंतर दुसऱ्या एका युझरने सोनालीला ट्रोल करत लिहीलं होतं की, ‘परदेशात मजा करत आहेत...कोव्हीड साठी मदत करा.’ यावर सोनालीने उत्तर देत म्हटलं, ‘खरचं???  तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही, म्हणून आम्ही काही केलंच नाही, किंवा करतंच नाही, असं होत नाही. मी काय मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी योग्य वाटत नाही असो, सगळ्यांना एकाच पठडीत बसवणं चूकीचं आहे. याशिवाय सोनालीच्या राहणीमानाविषयी, तिच्या संपत्तीविषयी खोटा प्रचार करणाऱ्यांचाही तिने खरपूस समाचार घेतला. व आपला कोणताही महाल नाही तर साधा फ्लॅट आहे असही ती म्हणाली.’ त्यामुळे या ट्रोलर्सचा सोनालीने चांगलाच समाचार घेतला आहे. सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजेच 18 मे रोजी दुबईत कुणाल बेनोदेकर याच्याशी लग्नगाठ बांधली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अगदी साधेपणाने एका मंदिरात जाऊन लग्न केलं. तर परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा सगळ्यांच्या साक्षीने लग्न करणार असल्याचंही तिने म्हटलं होतं.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या