नुकताच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आणि फुलवा आयकॉनिक ‘आइए मेहेरबा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. त्या दोघीही हे गाणं अगदी फील करत आहेत. आणि ते त्यांच्या डान्समधून दिसून येत आहे. सोनालीने व्हिडीओ शेयर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, ‘आम्ही मैत्रीची, एकेमकांवरील विश्वासाची, आदराची, प्रेमाची आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहण्याची 10 वर्षे आज सेलेब्रेट करत आहोत’. यावरूनचं त्यांच नातं किती दृढ आहे याचा अंदाज येतो. (हे वाचा: MPSC विध्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्रवीणचा संताप; म्हणाला, जगणार फक्त राजकारणी) सोनालीने फुलवासोबत ‘नटरंग’ मध्ये काम केलं होतं. या चित्रपटातील सोनालीच्या प्रसिद्ध लावणीची फुलवानेचं कोरियोग्राफी केली होती. ही लावणी सुपरहिट ठरली होती. तसेच सोनालीने फुलवाच्या कोरियोग्राफीमध्ये ‘झपाटलेला 2’ या चित्रपटाची एक लावणी केली होती. या चित्रपटामध्ये अभिनेता आदित्य कोठारे आणि सोनाली कुलकर्णी होती. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा हा सिक्वल होता. सोनाली आणि फुलवाच्या मैत्रीला 10 वर्षे पूर्ण झाल्याची कळताच सर्व चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच युजर्स कमेंट्स करून त्यांच्या मैत्रीचं कौतुकदेखील करत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.