मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनाक्षी सिन्हाचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, 30 वर्षांची होण्याआधी करायचं होतं 'हे' काम

सोनाक्षी सिन्हाचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, 30 वर्षांची होण्याआधी करायचं होतं 'हे' काम

सोनाक्षी सिन्हा ही दबंग या सिनेमातून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री. तिनं स्वत:चं एक महत्त्वाचं स्वप्न नुकतंच पूर्ण केलं.

सोनाक्षी सिन्हा ही दबंग या सिनेमातून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री. तिनं स्वत:चं एक महत्त्वाचं स्वप्न नुकतंच पूर्ण केलं.

सोनाक्षी सिन्हा ही दबंग या सिनेमातून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री. तिनं स्वत:चं एक महत्त्वाचं स्वप्न नुकतंच पूर्ण केलं.

    मुंबई, 24 जानेवारी : सोनाक्षी सिन्हानं (Bollywood actress sonakshi sinha) मुंबईच्या बांद्रा (Bandra) भागात 4 बीएचके अपार्टमेंट खरेदी केलं आहे. यातून तिनं करियरच्या सुरवातीला पाहिलेलं अतिशय खास स्वप्न (dream) पूर्ण झालं आहे. मात्र सोनाक्षीनं स्वतःच दिलेल्या माहितीनुसार ती सध्या तरी आपल्या आई-वडिलांचं घर (home of her parents) सोडून या नव्या घरात रहायला जाणार नाही. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेली सोनाक्षी सिन्हा आता 33 वर्षांची आहे. घर घेणं हे आपलं स्वप्न असल्याचं तिनं मागेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती म्हणाली होती, की मी या इंडस्ट्रीत काम करणं सुरू केलं तेव्हापासून हे माझं स्वप्न होतं. मी 30 वर्षांची होण्याआधी स्वतःचं घर घेईन असं स्वप्न मी मनाशी पाहिलं होतं. काही वर्षांपूर्वी खरंतर मी स्वतःला घातलेली ही डेडलाईन (deadline) मिस झाली. मात्र आता हे स्वप्न खरोखर प्रत्यक्षात आलं आहे. हे ही वाचा-वरुण-नताशा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा, व्हायरल होतायंत सेलेब्सबरोबरचे हे Photo सोनाक्षी पुढं सांगते, 'मला घरी आपल्या कुटुंबासोबत राहणं खूप आवडतं. सध्या तरी इथून कुठं दुसरीकडे राहायला जाण्याचा माझा प्लॅन नाही. हे घर मी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सोबतच गुंतवणूक करण्यासाठीही घेतलं आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोनाक्षीनं वडील शत्रुघन सिन्हा (Shatrughna Sinha) यांच्या 'रामायण' या घरात एक मजला रिनोव्हेट केला होता. इंटिरियर डिझायनर आणि आर्ट डिरेक्टर रुपीन सूचक यांनी या मजल्याला रिनोवेट करण्यासाठी सोनाक्षीची मदत केली होती. शेवटच्या वेळी सोनाक्षी दबंग ३ मध्ये दिसली होती. मला विश्वास आहे, की जे लोक आपल्या पालकांसोबत राहतात, त्याचा आनंद केवळ त्यांनाच माहीत असतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Parents, Sonakshi sinha

    पुढील बातम्या