परिणिती- सोनाक्षीमध्ये Cold War, सिनेमाच्या सेटवर एकमेकींशी बोलणं सोडलं

परिणिती- सोनाक्षीमध्ये Cold War, सिनेमाच्या सेटवर एकमेकींशी बोलणं सोडलं

एकीकडे कतरिना कैफ आणि आलिया भट्टमध्ये पुन्हा मैत्रीपूर्ण नातं तयार होत आहे तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये विस्तवही जात नाहीये.

  • Share this:

मुंबई, ०४ एप्रिल- एकीकडे कतरिना कैफ आणि आलिया भट्टमध्ये पुन्हा मैत्रीपूर्ण नातं तयार होत आहे तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रामध्ये विस्तवही जात नाहीये. पुढच्या वर्षी २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्य भूज- प्राइड ऑफ इंडियाच्या सेटवर सोनाक्षी आणि परिणीतीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिले नाहीत. एका एण्टरटेनमेन्ट वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दोघींमधलं संभाषण जवळपास बंदच झालं आहे. या दोघींमधल्या भांडणाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा सोनाक्षीने सिनेमाच्या लीड हिरोइनचं टायटल स्वतःच्या नावावर केलं. आता ही गोष्ट परिणीतीला तरी कशी आवडेल. तिने याबद्दल प्रोडक्शन टीमकडे तक्रार केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमात दोन्ही अभिनेत्रींची समसमान भूमिका आहे. त्यामुळे एकीनेच सिनेमाचं क्रेडिट घेणं चुकीचं आहे.

View this post on Instagram

💫 @sabyasachiofficial #PCkiShaadi

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

या सिनेमात सोनाक्षी एका सोशल वर्कर सुंदरबेन जेठा मधरपर्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. ही सोशल वर्कर स्थानिक महिलांना भूजचा एकमेव रनवे दुसऱ्यांदा तयार करण्यासाठी प्रोत्साहीत करते. हा रनवे १९७१ मध्ये भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान उद्धस्त करण्यात आलेला असतो. तर परिणीती या सिनेमात अण्डरकव्हर इंडियन एजन्ट हीना रहमानची व्यक्तिरेखा साकारत आहे.

या सिनेमाचा नायल अजय देवणग आहे. अजयने यात गुजरात, भूज एअरबेसचा इनचार्ज स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे. भूजमध्ये संजय दत्त, राणा डगूबत्ती आणि एमी विरक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक दुधैया याने केलं असून पुढच्यावर्षी १४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...

First published: April 4, 2019, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading