मुंबई, 1 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच प्रसिद्धी झोतात असते. 41 वर्षाची असूनही तिच्या बोल्डनेसमुळे ती चाहत्यांना थक्क करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच चाहत्यांना पसंतीस उतरत असतो. ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. अशातच कायम चर्चेत असणारी श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असलेली पहायला मिळत आहे. तिने सोशल मीडियावर मुलासोबतचे काही फोटो शेअर केले ज्यामुळे तिला सद्या ट्रोलिंगचा सामना करावा लगात आहे.
श्वेताने 30 नोव्हेंबरला तिचा मुलगा रियांशच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते. श्वेताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक फोटोमध्ये ती त्याला किस करताना दिसत आहे. मुलाला किस करतानाचा फोटो पाहताच नेटकरी तिच्या भडकले असून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. श्वेताने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे.
View this post on Instagram
'थोडी तरी लाज बाळगा, मुलाला किस करणे वाईट आहे', अशा अनेक प्रकारच्या कमेंट नेटकरी श्वेताच्या पोस्टवर करत आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रिटीला ट्रोल करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज नेटिझन्स कोणत्याही कारणास्तव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींना ट्रोल करायला लागतात.
हेही वाचा - लग्नानंतर काही तासातच प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; 37 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच ती एक सशक्त स्त्री देखील आहे. हे तिनं अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे श्वेता खाजगी आणि वैयक्तिक दोन्ही गोष्टीमुळे चर्चेत राहिली आहे. श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले आहे. पण या सगळ्यात तिला प्रसिद्धी छोट्या पडद्यावर मिळाली. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेने ती घराघरात प्रसिद्ध झाली.
दरम्यान, टीव्ही सीरियल्सची आवडती सून वाढत्या वयात अधिकाधिक सुंदर होत चालली आहे. तिचा फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना आवडतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Tv actress