• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पोलीस अधिकाऱ्याने अभिनेत्रीवर झाडली गोळी; 'त्या' दिवसाची थरारक घटना आली समोर

पोलीस अधिकाऱ्याने अभिनेत्रीवर झाडली गोळी; 'त्या' दिवसाची थरारक घटना आली समोर

पोलीस अधिकाऱ्यांनी भररस्त्यात या अभिनेत्रीवर गोळ्या झाडल्या.

 • Share this:
  इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध स्थिती अजूनही कायम आहेत. दोन्ही देशांमध्ये सततच्या हल्ल्यांमुळे अनेकांनी प्राण गमावले आहे. दरम्यान अनेक सैनिक जखमी झाल्याचे वृत्त सातत्याने पुढे येत आहे. या दरम्यान इस्त्रायली पोलिसांनी पॅलेस्टाईन अभिनेत्रीला गोळ्या घातल्याची एक बातमीही समोर आली आहे. बगदाद सेंट्रल सीरिजच्या पॅलेस्टीनी अभिनेत्री मैसा अब्द इलाहादी (Maisa Abd Elhadi) हिफा शहरात शांतता आंदोलनात सहभागी झाली. इस्त्रायली पोलिसांनी तिच्या पायावर गोळी झाडल्याचा दावा केला आहे आणि आता ती हळू हळू बरी होत आहे. प्रदर्शनाच्या काही वेळानंतर अभिनेत्रीने तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार मानले. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, आपण आयुष्यात कधीही अशी  पोस्ट लिहूस असा विचारही केला नव्हता. तिला खूप वाईट वाटत आहे. तिला माहित आहे की तिचे स्वतःचे लोक यापेक्षा अधिक त्रास सहन करीत आहेत आणि त्यास तोंड देत आहेत. दोन्ही बाजूंनी त्यांचं जीवन संकटात आहे. हे ही वाचा-ती किसिंग सीन करणार नाही’; अभिनेत्रीच्या वडिलांनी दिग्दर्शकासोबत केलं भांडण मसाने लिहिले की, रविवारी मी शांततापूर्ण निदर्शनात सहभागी झाले होते. आम्ही सर्वजण एकत्र गात होतो. मोठ्याने आक्रोश व्यक्त करीत होता. अभिनेत्री म्हणाली की, मी स्वत: तेथे गात होती आणि तिथे घडणाऱ्या घटनांचे शूटिंग करत आहे. निदर्शनानंतर थोड्या वेळानंतर एका सैन्याने ग्रेनेड्स आणि गॅस ग्रेनेड सोडण्यास सुरुवात केली. सर्व काही वेगाने बदलत होते. मी रस्त्याच्या कडेला उभे राहिले. मी एकटी होते आणि माझी पाठ सैन्याच्या पाठीसमोर होती. मसा पुढे लिहिते की, मी कोणालाही घाबरवत नव्हती. मी गाडीच्या दिशेने पुढे गेली. त्यावेळी मला बॉम्ब स्फोट झाल्याचा आवाज आला. मला वाटलं की माझी जीन्स फाटली, पण माझ्या पायातून रक्त वाहत होतं. अशाच एका तरुणाने मला त्या परिस्थितीतून वाचवलं. त्यांनी माझ्या पायाला गोळी मारली होती. ते पाहून मी खूप घाबरले. इस्त्रायली फोर्ससमोर सर्व तरुण-तरुणी ओरडत होते आणि मी त्यांच्यासमोर वेदनेने ओरडत होती. लोक मला वाचवायला आले आणि मला आंदोलनापासून दूर केलं. जवळील पार्कमध्ये माझ्यावर उपचार करण्यात आले.
  Published by:Meenal Gangurde
  First published: