मुंबई 20 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिजनेसमॅन राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई क्राइम (Mumbai Crime Branch) सोमवारी अटक केली. अश्लिल चित्रपट (Pornography) निर्मितीच्या आरोपात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी राज विरोधात आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचही म्हटलं आहे. पण यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक खळबळ उडाली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही अनेक मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. याच दरम्यान कॉमेडियन कपिल शर्माचा (Kapil Sharma) एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात राज कुंद्रा देखील आहे.
छोट्या पडद्याचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि शमिता शेट्टी यांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्माने त्यांना अनेक मजेशीर प्रश्न विचारले होते. तेव्हा कपिलने राजला विचारलं की, “तु नेहमीच कुठे ना कुठे फिरताना दिसतो, मग काहीही न करता पैसे कसे कमावतो?” यानंतर सारेचजण या प्रश्नावर हसू लागतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टी के पति राज कुंद्रा को क्राइम ब्रांच ने अश्लील फिल्में बनाने के आरोप मे किया गिरफ्तार. Finally everyone got the right answer of the question asked by kapil sharma on #TheKapilSharmaShow many years ago.#RajKundra #shilpashettykundra #RajKundraArrest pic.twitter.com/TcMFujKiyu
— Dessie Aussie 🇮🇳🇭🇲 (@DessieAussie) July 19, 2021
अश्लिल चित्रपटनिर्मिती आणि त्याला काही साइट्सवर, अँप्सवर अपलोड करणं यासंदर्भात राज कुंद्राला अटक झाली आहे. पण आणखीनही काही नावं समोर येत आहेत. याच दरम्यान मॉडेल शर्लिन चोप्रा (Sharlin Chopra) आणि पुनम पांडे (Punam Pandey) यांनी एक स्टेटमेंटही दिलं आहे.
दोघींनी महाराष्ट्र सायबर सेलला दिलेल्या स्टेटमेंटनुसार त्यांनी म्हटलं आहे की, त्यांना पॉर्न इंडस्ट्रीत आणणारा हा राज कुंद्राच आहे. त्याने शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये दिले होते. शर्लिनने राजसोबत जवळपास 15 ते 20 असे प्रोजक्ट केले आहेत. याच संदर्भात प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचही (Ekta Kapoor) सॉफ्ट पॉर्नोग्राफीत नाव पुढे आलं होतं. राज आणि एकताचही स्टेटमेंट घेण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Kapil sharma, Shilpa shetty