• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू; वाचा तपासाची Inside Story

चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू; वाचा तपासाची Inside Story

मुंबई क्राइम ब्रँचने शुक्रवारी मुंबईतील जुहू येथील राज आणि शिल्पा यांच्या बंगल्यावर धाड टाकली. यावेळी शिल्पाची देखील कसून चौकशी करण्यात आली होती.

 • Share this:
  मुंबई 24 जुलै : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra)  सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण राजच्या अश्लिल चित्रफिती प्रकरणामुळे शिल्पाच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. त्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचने शुक्रवारी मुंबईतील जुहू येथील राज आणि शिल्पा यांच्या बंगल्यावर धाड टाकली. यावेळी शिल्पाची देखील कसून चौकशी करण्यात आली होती. यावेळी शिल्पाचं अश्लिल चित्रफिती प्रकरणात स्टेटमेंट नोंदवण्यात आलं होतं. क्राइम ब्रँचच्या सुत्रांनुसार या संपूर्ण चौकशी दरम्यान शिल्पाला 3 ते 4 वेळा रडू कोसळलं होतं. याउलट शिल्पानेच अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, “काय खरचं राज अशा कोणत्याही अश्लिल चित्रफिती निर्माण केल्या आहेत?”

  सैफ नाही तर या व्यक्तीबरोबर आउटिंगसाठी गेली करीना; यावेळी घातलेल्या टॉपची किंमत वाचून व्हाल थक्क

  यानंतर शिल्पाने क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना हे देखील सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. तिच्या हातातून काही ब्रँड्स देखील गेले आहेत. हे सगळं सांगताना शिल्पाला रडू अनावर होत नव्हतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिला वियान इंडस्ट्रीजमधील शेअर होल्डींग्स विषयी देखील प्रश्न केले. तेव्हा राज आणि शिल्पाला समोरासमोर बसवून चौकशी देखील करण्यात आली.

  गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने...’

  यावेळी शिल्पाला काही महत्वपूर्ण प्रश्न विचारले गेले, * तुला हॉटशॉट विषयी माहीती आहे का व ते कोण चालवतं? * हॉटशॉटच्या व्हिडीओ कंटेटविषयी तुम्हाला माहिती आहे का? * तुम्ही कधी हॉटशॉटच्या कामात मदत केली आहे का? * कधी प्रदीप बक्शी ( राज कुंद्राचा मेहुणा) सोबत राज कुंद्राने हॉटशॉट बद्दल चर्चा केली होती? * तुम्ही २०२० मध्ये वियान कंपनीतून बाहेर का पडलात, जेव्हा की तुमचे मोठे शेअर्स होते? * तुम्हाला वियान आणि कॅमरिनमधील पैशांचा व्यवहार माहीत आहे? * अश्लिल चित्रफिती लंडनला पाठवणे आणि अपलोड करण्यासाठी अनेकदा वियानच्या ऑफिसचा उपयोग झाला हे तुम्हाला माहीत आहे का? * तुम्हाला राज कुंद्राच्या सगळ्या व्यवसायांची माहिती आहे? असे प्रश्न शिल्पाला विचारण्यात आले होते.
  Published by:News Digital
  First published: