कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, कूपर रुग्णालयात उपचार सुरू

कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायू, कूपर रुग्णालयात उपचार सुरू

अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यातून ती बरी होतच होती, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटना या अभिनेत्रीबरोबर घडली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) बरोबर फॅन (Fan) सिनेमात काम करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. कोरोनाला तिने हरवलंच होतं, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटना या अभिनेत्रीबरोबर घडली आहे. अभिनेत्रीने कोरोनाला हरवल्यानंतर तिला अर्धांगवायू झाला आहे. तिला मुंबईतील कुपर रुग्णायलात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शिखा एक सर्टिफाइड नर्स आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच तिने रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदयसम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. सहा महिने तिने ही सेवा केली. त्यावेळीच तिला कोरोनाची लागण झाली होती.

शिखाची मॅनेजर अश्विनी शुक्लने इन्स्टाग्रावर पोस्ट करत शिखाच्या पॅरलिसिसबाबत सांगितलं आहे. तिने असं म्हटलं आहे की, 'शिखा मल्होत्रा आज पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये आहे. कोव्हिडविरोधात लढाई जिंकल्यानंतर 10 डिसेंबरला रात्री पॅरालिसिस स्ट्रोक आल्यामुळे रुग्णलयात दाखल. ती बोलण्यासी असक्षम आहे. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना.'

शिखाने काही प्रसिद्ध सिनेमात काम केले आहे. फॅन (Fan) या सिनेमात तिने शाहरुखबरोबरही (Shahrukh Khan) स्क्रीन शेअर केली आहे. संजय मिश्रा यांच्या 2019 साली आलेल्या 'कांचली' या सिनेमात देखील तिने महत्त्वाचे काम  केले होते. तर तापसी पन्नू बरोबर तिने 'रनिंग शादी डॉट कॉम' मध्ये काम केलं आहे.

(हे वाचा-रुग्णालयाच्या बाहेर दिसली रेमो डिसूझा यांची पत्नी, PHOTO मध्ये सलमानही)

शिखा मल्होत्रा अभिनेत्री आणि सर्टिफाइड नर्स असण्याबरोबरच एक डान्सरही आहे.  शिखा ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची शिकार झाली होती. 22 ऑक्टोबरला तिला डिस्चार्ज मिळाला होता. काही महिन्यातच पुन्हा एकदा अशी धक्कादायक घटना घडली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 12, 2020, 1:25 PM IST

ताज्या बातम्या