तीन अज्ञात व्यक्तींनी शमिता शेट्टीला शिवीगाळ करत ड्रायव्हरला केली मारहाण

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या रस्त्यावर तिच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 06:01 PM IST

तीन अज्ञात व्यक्तींनी शमिता शेट्टीला शिवीगाळ करत ड्रायव्हरला केली मारहाण

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या रस्त्यावर तिच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आली आहे. या हल्ल्यात तीन अज्ञात व्यक्तींनी तिला शिवीगाळ केली आणि तिच्या ड्रायव्हरला मारहाणही केली. ठाण्यात मंगळवारी विवियाना मॉलच्या जवळ ही घटना घडली.

शमिताची गाडी बाइकस्वाराला लागली. त्यानंतर हे प्रकरण चिघळत गेलं. बाइकस्वाराने शमिताला शिवीगाळ करायला सुरुवात केली. शमिता ही शिल्पा शेट्टीची छोटी बहीण आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास बाइकस्वाराची आणि शमिताच्या गाडीची टक्कर झाली. यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरू झाली.

Loading...

यावेळी बाइकस्वाराचे दोन अजून सोबती होते. त्यांनी शमिताला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ड्रायव्हरला मारहाण केली.

शमिताने रबोडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली. शमिताने पोलिसांना बाइकचा तपशील दिला.

ड्रायव्हरने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, तीनही आरोपींनी त्याच्या कानशिलात लगावली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले.

दुसरीकडे पोलिसांनी तीनही आरोपांविरोधात आयपीसी कलम २७९, ३२३, ५०४, ४२७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींच्या गाडीचा शोध घेतला जात आहे.

शमिता सध्या सिनेमांपासून दूर असली तरी तिने नुकतेच खतरों के खिलाडीच्या ९ व्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता.

तिन ‘मोहब्बते’शिवाय ‘जहर’, ‘कॅश’ आणि ‘मोहब्बत हो गई है तुमसे’ सिनेमात काम केलं आहे. शमिताही बॉलिवूडमधील हिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीची छोटी बहीण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...