आर-पार फेम 'शकिला' काळाच्या पडद्याआड

आर-पार फेम 'शकिला' काळाच्या पडद्याआड

शकिला बेगम यांचा जन्म 1जानेवारी 1935ला झाला होता. त्यांच खरं नाव बादशाह बेगम असं होतं. त्यांना त्यांच्या काकूने सांभाळलं

  • Share this:

21 सप्टेंबर: रूपेरी पडद्यावरून एकेकाळी प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या नायिका शकिला यांचे  निधन झाले आहे.  मृत्यूसमयी त्या 82 वर्षांच्या होत्या.

शकिला यांचा जन्म 1 जानेवारी 1935 ला झाला होता. त्यांच खरं नाव बादशाह बेगम असं होतं. त्यांना त्यांच्या काकूने सांभाळलं .50 च्या दशकात दास्तानसारख्या सिनेमांमधून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यांचे आरपार आणि सीआयडी  श्रीमान सत्यवादी, श्रीमतीजी, उस्तादों के उस्ताद, रेशमी रुमाल  हे सिनेमे विशेष गाजले.

50 सिनेमांमध्ये काम केल्यानंतर 1963 साली त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर त्या ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. काही काळानंतर त्या भारतात परतल्या. 1993 साली त्यांनी राजद्रोही या सिनेमात कामही केलं.

त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यातलं एक अजरामर बाबुजी धीरे चलना-

First published: September 21, 2017, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading