Home /News /entertainment /

साडी काय ऋतुने गिफ्ट दिली का ?; सायली संजीवच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

साडी काय ऋतुने गिफ्ट दिली का ?; सायली संजीवच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

सायलीने आज लाल रंगाच्या साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र काही कमेंट या सर्वांचे लक्षवेधून घेत आहेत. त्या कमेंट ऋतुराज गायकवाड यांच्याशी संबंधीत आहे.

  मुंबई, 12ऑक्टोबर: मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव संजीव( sayali sanjeev ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. विशेष म्हणजे अलिकडे सायली संजीव युवा फलंदाज चेन्नई सुपरकिंग्ज'चा (Chennai Superkings - CSK) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्यामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सायलीने आज लाल रंगाच्या साडीतील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र काही कमेंट या सर्वांचे लक्षवेधून घेत आहेत. त्या कमेंट ऋतुराज गायकवाड यांच्याशी संबंधीत आहे. सायली साडीत पाहून एका चाहत्याने तर साडी काय ऋतुने गिफ्ट दिली का? , अशी कमेंट केली आहे. सायलीने अधिकृत इन्स्टावर तिचे काही लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने लाल रंगाची पैठणी नेसल्याचे दिसत आहे. यासोबतच या साडीवर तिने हिरव्या रंगाचे स्लीव्हलेस बॅकलेस ब्लाऊज घातले आहे. नाकात नथ देखील घातली आहे. तिचा हा मराठमोळा लुक पाहुन चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे. यासोबत काही कलाकार मंडळीने देखील यावर कमेंट केल्या आहेत.
  सायलीच्या फोटोवर शिवानी बावकरने ओह तर अन्विता फलटणकरने आहा.. अशी कमेंट केली आहे. त्याच्यासोबत चाहत्यांनी देखील एकापेक्षा एक अशा भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की,साडी काय ऋतुने गिफ्ट दिली का? तर दुसऱ्याने म्हटले आहे की,ऋतु इतने में पिगले गा तर आणखी एकाने म्हटले आङे की, हा सगळा खटाटोप ऋतुराजसाठी चालू आहे तर दुसऱ्याने म्हटले आहे की, लवकर लग्न करा ऋतुराजसोबत. वाचा : सिनेमा थिएटरबरोबर नाट्यगृहसुद्धा उघडणार; या आहेत अटी आणि नियम यासोबतच नुकातेच चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (CSK vs DC) 4 विकेट्सनं पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला आहे. या विजयात युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, ऋतुराजच्या चांगल्या फार्ममुळे अभिनेत्री सायली संजीव चांगलीच चर्चेत आली होती. 'आज तुमचे हे चांगले खेळले' अशा कमेंट्स सायलीने शेअर केलेल्या फोटोवर आल्या होत्या. वाचा : आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही दुधी ठरला जीवघेणा; कसा ओळखायचा विषारी दुधी भोपळा? कसा झाला हा कमेंटचा सिलसिला सुरू काही दिवसापूर्वी अभिनेत्री सायली संजीवने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोवर ऋतुराजने 'Woahh😍♥️' (वोआह) अशी कमेंट केली होती. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. ही कमेंट वाचून दोघांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला होता. कोणी म्हणालं, यांचं जमतंय बहुतेक, तर कोणी सायली रिलेशनशीपमध्ये आहे भाऊ, असं म्हणत ऋतुराजची विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Sayali Sanjeev, TV serials

  पुढील बातम्या