कार्तिक आर्यन नाही तर 'या' व्यक्तीसोबत साराला घालवायचंय तिचं संपूर्ण आयुष्य

कार्तिक आर्यन नाही तर 'या' व्यक्तीसोबत साराला घालवायचंय तिचं संपूर्ण आयुष्य

सारा लवकरच इम्तियाज अलीच्या एका सिनेमात कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून : बॉलिवूड पदार्पणातच केदारनाथ आणि सिंबा सारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी तिच्या आउटफिट्सची चर्चा होते तर कधी कार्तिक आर्यनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत असते. लवकरच ती कार्तिक सोबत इम्तियाज अली यांच्या एका सिनेमात दिसणार आहे. सारा आणि कार्तिकनं अद्याप त्यांच्यातील नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरीही चाहते मात्र या जोडीवर खूश आहेत. पण सारानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केलेल्या एका विधानमुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसू शकतो.

सारानं Bazaar India ला दिलेल्या मुलाखतीत सारानं आपल्या लग्नाचा प्लान सांगितला आणि याचवेळी तिनं लग्नानंतर तिला तिचं संपूर्ण आयुष्य कोणासोबत काढायचं आहे याचाही खुलासा केला. Bazaar India ने त्यांच्या अधिकृत अकाउंटवर सारा फोटो शेअर करत साराचं हे विधान कोट केलं. त्यांनी लिहिलं, 'माझ्या आईसोबत आयुष्यभर राहण्याची माझी इच्छा आहे. मी जेव्हा तिला हे सांगिते तेव्हा तिला खूप काळजी वाटते. कारण तिच्याकडे माझ्या लग्नाचा पूर्ण प्लान आहे. मी नेहमी तिच्यासोबत बाहेर जाते. पण तिच्यापासून जेव्हा मी काही दिवसांसाठी दूर जाते तेव्हा मात्र मला तिची खूप आठवण येते.'

शाहिद आणि कियाराचा हा Kissing सीन होतोय Viral

View this post on Instagram

“I intend to live with my mother for the rest of my life. She gets upset when I say that because she has this whole marriage plan for me, but she can also come with me no, what’s the problem? I love hanging out with her, and I miss her when she’s away even for a few days,” says @saraalikhan95, our cover star this month. • • • Editor: Nonita Kalra (@nonitakalra) Creative director: Yurreipem Arthur (@yurreipemarthur) Fashion director: Edward Lalrempuia (@edwardlalrempuia) Text by: Esha Mahajan (@esha.mahajan) Photographer: Signe Vilstrup (@signe_vilstrup) Hair: Florian Hurel (@florianhurel) at Artist Factory India (@artistfactoryindia) Make up: Anil Chinnappa Dress: Sahil Kocchar (@sahilkochar) Earrings and ring: Anita Dongre (@anitadongre) Photographers agency: Anima Creative Management (@animacreatives) Production: Parul Menezes(@parulmenezes) Fashion Assistant: Smridhi Sibal (@smridhisibal) Location courtesy: Soho House, Mumbai (@sohohousemumbai) #SaraAlikhan #bazaarindia #juneissue

A post shared by Harper's Bazaar, India (@bazaarindia) on

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यातील जवळीक सध्या वाढताना दिसत असून हे दोघंही अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. नुकतेच ते ईदच्या दिवशी त्यांचा चेहरा लपवून फिरताना दिसले. तसेच काही दिवसांपूर्वी हे दोघं कारमध्ये गप्पा मारत बसलेले असताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी खास नातं आहे हे एव्हाना सर्वांनाच समजलं आहे. पण भविष्यात साराच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्याला घरजावई व्हावं लागणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा व्यक्त झाली काजोल, इन्स्टाग्रामवर लिहिली अशी पोस्ट

View this post on Instagram

Eid Mubarak 💫

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सारा लवकरच इम्तियाज अलीच्या एका सिनेमात कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा सिनेमा 'लव्ह आज कल'चा सीक्वेल असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'च्या रिमेकमध्येही दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वरुणचे वडील डेव्हिड धवन करणार असून या सिनेमाचं शूटिंग बँकॉकमध्ये होणार आहे.

'या' प्रेग्नंट बॉलिवूड अभिनेत्रीचा अल्ट्रा साउंड व्हिडिओ होतोय व्हायरल

First published: June 6, 2019, 11:49 AM IST

ताज्या बातम्या