मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हिजाबवरून खिल्ली उडवणाऱ्याला सना खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली...

हिजाबवरून खिल्ली उडवणाऱ्याला सना खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली...

बिग बॉस आणि काही इतर मालिका, चित्रपटांमध्ये दिसलेल्या सना खानने चित्रपट संन्यास घेऊन संसाराबरोबरच धर्मसेवा सुरू केली आहे. हिजाब घातला म्हणून खिल्ली उडवणाऱ्याला तिने काय उत्तर दिलं पाहा...

मुंबई 3 जून : बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमध्ये पूर्वी दिसणारी अभिनेत्री सना खान (Sana Khan) सध्या तिच्या वैवाहिक आणि अध्यात्मिक जीवनात सुखी आहे. तिने फिल्मी दुनियेचा आणि अभिनयापासून संन्यास घेतला आहे. सिनेसृष्टीला कायमचा राम राम ठोकला आहे. आता ती हिजाब आणि बुरखा परिधान करते. पण यामुळे काही जण ट्रोलही करतात. अशाच एका ट्रोलरला तिने सणसणीत उत्तर दिलं आहे.

सना खानने मागील वर्षी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसं तिने सोशल मीडियावरून जाहीरही केलं. धर्मासाठी आपला हा निर्णय घेतला, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर तिने एका मौलवी व्यक्तीशी विवाह केला आणि ती आता संपूर्ण वेगळंच जीवन जगत आहे. सनाने नुकताच तिचा नवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर अनेकांनी तिला चांगल्या कमेंट्स दिल्या पण एका युझरने तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.

'बजरंगी भाईजान' सिनेमातील मुन्नी आठवतेय?, मग तिचे 'हे' फोटो एकदा बघाच

तो युझर म्हणाला, ‘इतकं शिकून काय फायदा, सगळ्यांसारखं पडद्यातचं राहायचं होतं तर.’ यावर सनाने त्याला जोरदार उत्तर दिलं, ती म्हणाली, ‘माझ्या भावा पडद्यात राहून मी माझा व्यवसाय करू शकते, मला चांगलं सासर मिळालं आहे. चांगला पती आहे. यापेक्षा आणखी काय हवं. आणि सर्वांत महत्त्वाचं अल्लाह माझं संरक्षण करतो आहे. अल्हामदुलिल्हा.’

सना आता अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे. ती सतत कुराणातले दाखले देऊन पोस्ट करत असते. या ग्रंथातील संदर्भ असलेले संदेश सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच अनेकांना ती मार्गदर्शनही करते.

सनाने काही चित्रपट तसेच मालिकातही काम केलं होतं. ‘वजह तुम हे’, ‘जय हो’ याशिवाय ‘बिग बॉस’ मध्येही ती दिसली होती. अन्य काही रियॅलिटी शो मध्येही ती झळकली होती.

First published:

Tags: Actress, Entertainment