धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान या कारणामुळे होतेय ट्रोल

धर्मासाठी सिनेसृष्टी सोडून मौलवीशी केला निकाह; सना खान या कारणामुळे होतेय ट्रोल

धर्मासाठी सिनेसृष्टीतून संन्यास घेणाऱ्या सना खानने (Sana Khan) नुकताच मौलवीशी निकाह केला. त्यानंतर एका कारणामुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: धर्मासाठी सिनेसृष्टीतून संन्यास घेणाऱ्या सना खानने (Sana Khan) शुक्रवारी रात्री गुजरातमध्ये लग्न केलं आहे. मौलाना मुफ्ती अनसशी तिने सुरतमध्ये लग्न केलं. सना आणि तिच्या नवऱ्याचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सना खान बिग बॉस 6 मध्ये (Bigg Boss 6) झळकली होती.

एका व्हिडीओमध्ये सना पांढऱ्या रंगाचा हिजाबसह भरतकाम केलेला ड्रेस घातला आहे. तर नवऱ्याने मुफ्ती अनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. असं दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सना तिच्या नवऱ्यासोबत केक कापत आहे असं दिसत आहे.

सिने सृष्टी सोडण्याचा निर्णय घेताना तिने लिहीलं होतं की, मी अनेक वर्षांपासून फिल्मी इंडस्ट्रीमध्ये आयुष्य जगत होते. त्यामुळे मला प्रेक्षकांकडून मान, सन्मान मिळाला आहे. भरपूर पैसाही मी मिळवला आहे. माणसाला कधीही मरण येऊ शकतं आणि मरणानंतर त्याचं काय होईल? या प्रश्नांची उत्तरं मी  फार वर्षांपासून शोधत आहे. विशेषतः मृत्यूनंतर माझं काय होईल याबद्दल मी अधिक विचार करते.'

सना पुढे लिहीते, ‘जेव्हा मी धर्मात या गोष्टीचं उत्तर शोधलं तेव्हा मला समजलं की माणसाला मिळालेलं आयुष्य मृत्यूनंतरचं जीवन सुधारण्यासाठी आहे. आणि त्यामुळे मी पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर जात आहे.’ पण आता सनाच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत काही जण तिला शुभेच्छा देत आहेत तर काही मेकअप करणं आणि लग्नाननंतर केक कापणं या कारणामुळे ती ट्रोलही होत आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 21, 2020, 10:28 PM IST
Tags: bigg boss

ताज्या बातम्या