Home /News /entertainment /

ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलीला बलात्काराची धमकी; MBBS करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीला अटक

ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलीला बलात्काराची धमकी; MBBS करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीला अटक

त्या 23 वर्षीय तरुणीने अशी धमकी का दिली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

  मुंबई, 06 डिसेंबर: उत्तम अभिनय, अप्रतिम लावण्य आणि दिलखेचक अदा यामुळे संपूर्ण 80-90 दशकातला काळ ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा (Salma Agha) यांनी गाजवला. 'दिल कें अरमा आसूओं' मे बह गए या गाण्यामुळे सलमा आगा यांनी अनेकांच्या मनावर आपलं नाव कोरलं. सलमा आगा यांची मुलगी सध्या चर्चेत आली आहे कारण त्यांच्या मुलीने अर्थात झाराने (Zara Khan) आपल्याला बलात्काराची धमकी मिळल्याची तक्रार मुंबई पोलिसात केली आहे. इन्स्टाग्रामवरुन तिला ही तक्रार आली असल्याची माहिती मिळत आहे. बलात्काराच्या धमकीरकरणी पोलिसांनी 23 वर्षीय MBBSच्या विद्यार्थीनीला अटक केली आहे. या मुलीने खोटं अकाऊंट बनवून सलमा आगा यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली. झाराने या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या मुलीला शोधून काढलं आहे. नूर सरवर असं अटक केलेल्या मुलीचं नाव आहे. नूर आणि तिचा पार्टनर एका राजकीय पक्षासाठी काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पण झाराला अशा धमक्या देण्याचा उद्देश काय होता याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
  View this post on Instagram

  A post shared by Zara Khan (@zarakhan)

  झाराने आपल्या आईच्याच पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करायचं ठरवलं आहे. औरंगजेब, देसी कट्टा या सिनेमांमध्ये ती झळकली होती. आपल्या आईप्रमाणेच सौंदर्याची देणगी तिला लाभली आहे. सलमा आगा यांनी निकाह या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या मुळच्या पाकिस्तानी वंशाच्या आहेत. त्यांचं बालपण लंडनमध्ये गेलं. त्यानंतर त्यांना बॉलिवूडचे वेध लागले. पण बॉलिवूडमध्ये त्यांना फारसं काम मिळालं नाही.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood actress

  पुढील बातम्या