26/11 दहशतवादी हल्ल्यावर येतोय चित्रपट; सई मांजरेकर साकारणार महत्वाची भूमिका

26/11 दहशतवादी हल्ल्यावर येतोय चित्रपट; सई मांजरेकर साकारणार महत्वाची भूमिका

'मेजर' (Major) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री सई (Saiee Manjrekar) मांजरेकर यात प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 3 एप्रिल – 'मेजर' (Major) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री सई (Saiee Manjrekar) मांजरेकर यात प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची कन्या सईचा हा दुसरा चित्रपट असून तिच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मेजर हा चित्रपट 26/11 आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदिप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan)  यांच्या  जीवनावर आधारीत आहे. याच चित्रपटातील सई चा फर्स्ट लूक (first look out)  आता समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

चित्रपटात सई मेजर च्या म्हणजेच संदिप यांच्या प्रेयसी च पात्र साकारत आहे. तर या फर्स्ट लूक मध्ये ती एख शाळकरी मुलगी दिसते आहे. चित्रपटात सई चा सोळा वर्ष ते २८ वर्ष असा प्रवास आहे. ज्यात ती कशाप्रकारे मेजर संदिप च्या प्रेमात पडली याची कथा उलगडणार आहे. चित्रपटात अदिवी शेष (Aadivi Shesh) दाक्षिणात्य अभिनेता मेजर संदिप यांची भूमिका  साकारणार आहे. चित्रपट तेलुगू (telugu) आणि हिंदी (hindi) दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. सई यासाठी खास तेलुगू भाषेचं प्रशिक्षण घेतलं आहे.

‘असा अभिनय यापूर्वी पाहिला नाही’; कार्तिक आर्यनचा धमाका पाहून अमृता झाली स्तब्ध

विशेष म्हणजे तेलुगू भाषेसाठी सई ने कोणत्याही डबिंग आर्टिस्ट मदत घेतली नाही. तर तिने स्वता यासाठी भाषेवर काम केलं आणि  त्यामुळे निर्माते सई वर फारच खूष आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट लूक नंतरच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. तर येत्या 12 एप्रिल ला चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोभिता धूलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2 जुलै 2021 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सशी किरण टिक्का यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून सोनी पिक्चर फिल्म्स इंडिया आणि महेश बाबू (Mahesh Babu) चे जी.एम .बी एंटरटेनमेंट अँड ए प्लस एस मूवीज निर्मिती करत आहेत.

Published by: News Digital
First published: April 4, 2021, 3:55 PM IST

ताज्या बातम्या