'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड

'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : अभिनेत्री सई ताम्हणकर कुणाला तरी डेट करत असल्याचं ती वारंवार सांगत होती. मात्र या मिस्ट्री मॅनचं नाव काही समोर येत नव्हतं. मात्र आता हे नाव उघड झालं आहे.

सई ताम्हणकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे. घनश्याम लालसा हा तिचा नवा बॉयफ्रेंड आहे. सईने सोशल मीडियावरून हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोण आहे घनश्याम लालसा?

घनश्याम लालसा हा देखील अभिनेता आहे. त्यानं हायर, हंसा यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकताच सईने त्याच्यासोबत फोटो शेअर केल्याने त्याचं नाव समोर आलंय. घनश्याम मात्र अनेकदा त्याच्या सोशल अकाऊंटवरून सईसोबतचे त्याचे फोटो शेअर करत असतो.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'दुनियादारी' सारख्या अनेक हिट ठरलेल्या सिनेमात तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या जोरावर प्रेक्षकांमध्ये ती चांगलीच लोकप्रिय झाली. त्यामुळे तिच्या रिलेशनची चर्चा होत आहे.

VIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप

First published: November 20, 2018, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading