मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पहिल्यांदा मी ठीक होते पण इंग्रजी शिकले अन्..'; सईचं भन्नाट Reel पाहून हसून व्हाल लोटपोट

'पहिल्यांदा मी ठीक होते पण इंग्रजी शिकले अन्..'; सईचं भन्नाट Reel पाहून हसून व्हाल लोटपोट

सई सोशल मीडियावर सक्रीय असलेली पहायला मिळते. अशातच सई ताम्हणकरचं एक भन्नाट रील्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सई सोशल मीडियावर सक्रीय असलेली पहायला मिळते. अशातच सई ताम्हणकरचं एक भन्नाट रील्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सई सोशल मीडियावर सक्रीय असलेली पहायला मिळते. अशातच सई ताम्हणकरचं एक भन्नाट रील्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 16 जून : मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि तितकीच अभिनयात मुरलेली म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर(Sai Tamhankar). मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सईनं(Sai Tamhankar Latest News) अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. सईनं तिच्या अभिनयातून तिची एक खास ओळख निर्माण केली आहे. सई सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. अशातच सईचं एक भन्नाट रील्स व्हायरल (Sai Tamhankar reel)होत आहे. आर.जे श्रुती आणि सईनं एक रील्सनं बनवलं आहे. या रील्समध्ये सई आणि श्रुती म्हणताय की, 'पहिल्यांदा मी ठीक होते, मग मी थोडीशी इंग्रजी शिकले आता मी फाईन आहे.'सईचं चे काॅमेडी रील्स सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ सईच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. पाहा व्हिडीओ - 
View this post on Instagram

A post shared by RJ Shrutii (@rjshrutii)

सई सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे नवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इतकच नव्हे तर तिच्या आगामी प्रोजेक्टची माहितीची चाहत्यांना देत असते. नुकताच सईला IIFA अवॉर्डस २०२२ मध्ये सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘मिमी’ (Mimi Film) या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका शमा सगळ्यांनाच फार आवडली होती. वाचा-मिलिंद गवळी वाढदिवशी मिस करतायत आईला, भावुक पोस्ट लिहित आठवणींना दिला उजाळा या चित्रपटाच्या निमित्तानं तिला क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. सईने थेट दुबईच्या धरतीवर जाऊन मराठीचं नाव राखलं आणि नुसतं राखलं नाही तर अभिमानाने उंच सुद्धा केलं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. एवढ्या मोठमोठ्या बॉलिवूड स्टारसोबत सईचं नाव नामांकनात आहे यावरच तिचं कौतुक केलं जात होतं.. आता पुरस्कार मिळाल्यानंतर तर तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Sai tamhankar

पुढील बातम्या