अभिनेत्री सई सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टीव्ह दिसून येते. ती दिवसातून एक तरी पोस्ट सोशल मीडियावर शेयर करतेच. सई सध्या चित्रपटांपासून दूर असली, तरी ती सोशल मीडियाच्या माध्यामतून चाहत्यांचं मनोरंजन करत असते. सई आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आपल्या पतीसोबत एका घनदाट जंगलात असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या लुकवरून ते दोघे ट्रेकिंगला गेल्याचं दिसत आहे. (हे वाचा:'गंदी बात' फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका; नुकताच मिळाला होता जामीन ) तसेच हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील आहे. यामध्ये सई आणि तिचा पती जंगल सफर एन्जॉय करत असल्याचं दिसत आहेत. सई ‘जंगल है आधी रात है’ गाण्याने या व्हिडीओची सुरुवात करते आणि नंतर तिचा पतीसुद्धा यामध्ये जॉईन होतो. असा या जोडीचा हा सुंदर व्हिडीओ आहे. सईच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खुपचं पसंत पडत आहे. चाहते कमेंट्स करून या जोडीचं कौतुक करत आहेत. (हे वाचा: ‘आज मेरे ज़मीं पर नहीं हैं कदम’; मानसी नाईकचा पतीसोबत रोमँटिक Video Viral) सईने काही महिन्यांपूर्वीच तीर्थदीप रॉयशी लग्न केलं आहे. या दोघांची ओळख एका सोशल मीडिया साईटवर झाली होती. सध्या दोघेही आपलं वैवाहिक जीवन खुपचं एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.