पाकिस्तानी अभिनेत्रीनं भारतीय गाण्यावर केला भन्नाट डान्स, कारमधला डान्स VIDEO VIRAL

पाकिस्तानी अभिनेत्रीनं भारतीय गाण्यावर केला भन्नाट डान्स, कारमधला डान्स VIDEO VIRAL

इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही पाकिस्तानी अभिनेत्री भारतीय गाण्यांवर नाचताना पाहायला मिळते आहे.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : इरफान खानचा चित्रपट ‘हिंदी मीडियम’ची अभिनेत्री सध्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. याआधी देखील तिनं केलेल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. पाकिस्तानी अ‍ॅक्टर सबा कमरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये सबा कमर ही चक्क भारतीय गाण्यांवर नाचताना पाहायला मिळते आहे.

सबा व्हिडीओमध्ये ‘नागिन’ गाण्यावर डान्स करताना पाहायाला मिळते आहे.सबा सोशल मीडियावर अनेकदा भारतीय गाण्यांचा आनंद घेताना पाहायला मिळते. सबाच्या चाहत्यांनी देखिल हा व्हिडीओ शेयर केला आहे. कारमधून प्रवास करताना आपण गाण्यांचा आनंद घेत प्रवास करतो. ही पाकिस्तानी अ‍ॅक्टर मात्र या गाण्यांवर चक्क कारमध्येच डान्स करते आहे. सबा 'नागिन: तेरी बीन सुने परदेसी' गाण्यावर इंजॉय करताना दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

❤😍😍 @sabaqamarzaman @meshalcheema95 . . . #sabaqamar #sabaqamarzaman #cheekh #saba #love #kamli

A post shared by sabaqamarzaman (@sabaqamar.holic) on

'अखिंयो सें गोली मारे' गाण्यावर देखिल सबाने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या गाण्यावर तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सबा अनेकदा बॉलिवुडच्या गायकांसोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत असते. सबा कमरला ‘हिंदी मीडियम’मुळे नवी ओळख मिळणार आहे.

हे वाचा:ओळखलं का कोण ते? 'बिग बीं'नी शेअर केला जगासमोर कधीही आला नाही असा फोटो

'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील'

First published: March 5, 2020, 10:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading