मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीला त्यावेळी वाटली SEXY शब्दाची भीती

बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीला त्यावेळी वाटली SEXY शब्दाची भीती

त्यामुळे या अभिनेत्रीने बॉलीवूड सोडलं होतं. हिंदी चित्रपटात तिने काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे या अभिनेत्रीने बॉलीवूड सोडलं होतं. हिंदी चित्रपटात तिने काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे या अभिनेत्रीने बॉलीवूड सोडलं होतं. हिंदी चित्रपटात तिने काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई, 26 जून : आज आपल्या बोल्ड आणि सेक्सी (BOLD AND SEXY) लूकसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिया सेन (RIYA SEN) हिला एकेकाळी सेक्सी, बोल्ड याच शब्दांची भीती वाटत असे, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रियाने हा खुलासा केला आहे आणि याच कारणामुळे ती बॉलीवूडपासून (BOLLYWOOD) दूर झाली. हिंदी चित्रपटात तिनं काम करणं बंद केलं होतं.

रिया सेनची आजी सुचित्रा सेन, आई मून मून सेन आणि बहीण रायमा सेन या सर्वच अभिनेत्री. अभिनयाचा वारसाच तिला लाभला. रियानेही खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1998 साली 'याद पिया की आने लगी' या फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडीओतून ती जास्त प्रसिद्ध झाली. यानंतर 1999 साली ताजमहाल या तामिळ चित्रपटातून तिला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केलं.

हे वाचा - अरे देवा! आता दीपिका-आलियाचं 'मेल व्हर्जन', तुम्ही पाहिलेत का हे अजब PHOTOS

रिया म्हणाली जेव्हा तिनं बॉलीवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला त्यानंतर मिळालेल्या यशामुळे ती खूप उत्साही होती. मात्र या यशासह सेक्सी आणि बोल्ड हा टॅगही लागला. यामुळे आपण हिंदी चित्रपटात काम करणं बंद केल्याचं रियाने सांगितलं.

रिया म्हणाली, "माझे काही चित्रपट हिट झाल्यानंतर ज्या चित्रपटांमध्ये मी काम केलं ते खरंतर माझ्यायोग्य नव्हतेच असं मला दिसून आलं. त्या चित्रपटातील भूमिका करताना मी कम्फर्टेबल नव्हते. त्यामुळे लोकं मी चांगली अभिनेत्री नाही असा विचार करू लागले आणि मी त्यांना दोषही देत नाही. त्यावेळी मी बरेच बॉलीवूड चित्रपट केले. मी घालत असलेले कपडे, मी करत असलेला मेकअप सर्वकाही सेक्सी होतं आणि मी त्यामध्ये बसत नव्हते"

हे वाचा - 'तुला आमचा फुल्ल सपोर्ट',असं काय झालं की रिंकुला चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

सेक्सी आणि बोल्ड हे टॅग रियाला भयंकर वाटू लागले, त्याची तिला भीती वाटू लागली.

रियाने सांगितलं, "असे टॅग मिळणं माझ्यासाठी भयंकर आणि भीतीदायक होतं. आणि त्यांच्यासह जगणं म्हणजे... जेव्हा सेक्सी म्हटलं गेलं तेव्हा मी शाळेत होते. मी बाहेर जायचे तेव्हादेखील लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता.  'ओह रिया सेन' अशी त्यांची प्रतिक्रिया असायची. कारण तुम्ही जसं स्क्रिनवर आहात तसेच खऱ्या आयुष्यातही आहात असं त्यांना वाटायचं"

"प्रत्येकाला ग्लॅमर हवा असतो, यात वादच नाही. मात्र मी इथे आले तेव्हा खूप तरुण होते. मी या सर्व भूमिका केल्या, मिनी स्कर्ट घातले, क्युट अॅक्टिंग केली. जेव्हा मी स्वत:ला स्क्रिनवर पाहायचे तेव्हा ही मीच आहे यावर मला विश्वासच बसायचा नाही.  मला खूप अस्वस्थ वाटायचं. ती मी नव्हतेच. सेटवर जाऊन तासनतास केस कुरळे करणे आणि मेकअप करून बसणं, हे मी करू शकत नाही. हे माझ्यासाठी नाही. त्याच क्षणी मी निर्णय घेतला बॉलीवूड चित्रपटात काम करणं बंद करायचं", असं रियाने सांगितलं.

हे वाचा - कोरोनामुळे परदेशात अडकली अभिनेत्री, तिला पाहायला चाहते करतात घरासमोर गर्दी!

बॉलीवूड सोडून रिया बंगाली सिनेमांकडे वळली. तिथं तिला खूप प्रसिद्धी मिळाली, जशी तिला हवी तशी.

रिया म्हणाली, "बंगाली चित्रपटात मला जे ग्लॅमर हवं होतं ते मिळाल. जिथं मी बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका केल्या. बंगाली चित्रपटात मी माझी क्षमता दाखवू शकले. बॉलीवूडचे दिग्दर्शक जे कधीच समजू शकले नाही असं मला वाटतं. त्यांना जे हवं होतं, ते मी करत होते. आज मी काय करू शकते हे मला माहिती आहे"

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Actress, Bold actress, Riya sen, Sexy