मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

साकीब सलीम सोबत दिसली अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अलिबाग वरून परतले दोघेही

साकीब सलीम सोबत दिसली अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अलिबाग वरून परतले दोघेही

अभिनेत्री रिया चक्रवर्ती साकिब सलीम सोबत अलिबागहून परतली, तर बर्थडे सेलिब्रेशन साठी दोघेही अलिबागला गेले होते.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती साकिब सलीम सोबत अलिबागहून परतली, तर बर्थडे सेलिब्रेशन साठी दोघेही अलिबागला गेले होते.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती साकिब सलीम सोबत अलिबागहून परतली, तर बर्थडे सेलिब्रेशन साठी दोघेही अलिबागला गेले होते.

  • Published by:  News Digital

मुंबई 10 एप्रिल - अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)  अनेक दिवसांपासून मीडिया पासून दूर आहे. सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) प्रकरणानंतर तीची मीडिया मध्ये  तसेच जनमाणसांत मोठी चर्चा होती. पण जेल मधून परतल्यानंतर ती पूर्णपणे गायब झाली होती. पण नुकतेच रिया ला मुंबई मध्ये अभिनेता साकीब सलीम (saquib salim) सोबत पाहण्यात आलं. दोघेही अलिबागहून परतत होते. (Rhea Chakraborty spotted with saquib salim)

साकीब सलीमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते अलिबाग ला गेले असल्याचं वृत्त समोर येत आहे. रिया आणि साकिब सोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) ला देखिल स्पॉट करण्यात आलं. साकीबच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी ते अलिबाग ला गेले होते. रिया आणि साकिब यांनी 'मेरे डॅडी की मारुती' (Mere Daddy ki Maruti)  या चित्रपटात काम केलं होतं.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यु प्रकरणात रियाचं नाव आलं होतं आणि त्यामुळे रिया ला काही दिवस कारागृहात देखिल काढावे लागले. तर अजूनही या केस ची चौकशी सुरू आहे. पण रिया हळू हळू आता तिचं जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

‘मस्ती’ची17 वर्षं, रितेश देशमुखने जुन्या सहकाऱ्यांबरोबर पुन्हा केली मस्ती, पाहा LIVE VIDEO

लवकरच रिया एका चित्रपटात देखिल दिसणार आहे. दिग्दर्शक रूमी जाफरी (Rumi jaffery) यांच्या ‘चेहरे’ (Chehere)  या चित्रपटात ती दिसणार आहे. पण चित्रपटाच्या पोस्टरमधून मात्र तिला गायब करण्यात आलं आहे. पोस्टर मध्ये तिचा कुठेही चेहरा दिसत नाही. यावर चित्रपटाचे निर्माते आनंद पंडीत यांनी उत्तर देताना चित्रपटाचे मुख्य कलाकार हे अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) आहेत असं म्हटलं. त्यामुळे सगळा फोकस हा त्यांच्यावरच असेल असही सांगण्यात आलं.

First published:

Tags: Bollywood actress, Rhea chakraborty