अभिनेत्री रेखांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने बंगला केला सील

अभिनेत्री रेखांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने बंगला केला सील

देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून मुंबईत याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता अमिर खान यांच्यानंतर अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा मुंबईतील बंगला पालिकेकडून सील करण्यात आला आहे. त्याशिवाय रेखा यांच्या बंगाल्याच्या बाहेर पालिकेने नोटीसही जारी केली आहे.

त्यांचा बंगला वांद्रे येथील बॅडस्टॅंड भागात आहे. त्यांच्या घराची रक्षा करण्यासाठी कायम 2 सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेकडून रेखा यांचा संपूर्ण बंगला सॅनिटाईझ करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे वाचा-अमिताभ बच्चन यांना कोरोना, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

दरम्यान देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच  एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपने नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यात बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने अख्ख्या बॉलिवूडला धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 11:38 PM IST

ताज्या बातम्या