मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिनेत्री रेखा यांचीही होणार टेस्ट 

सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिनेत्री रेखा यांचीही होणार टेस्ट 

सध्या पालिकेकडून रेखांचा बंगला सील करण्यात आला आहे

सध्या पालिकेकडून रेखांचा बंगला सील करण्यात आला आहे

सध्या पालिकेकडून रेखांचा बंगला सील करण्यात आला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 12 जुलै : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बिग बी यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्याशिवाय 11 जुलै रोजी अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांचा बंगला पालिकेने सील केला आहे. त्यामुळे आता रेखा यांचाही कोरोना चाचणी केली जाणार आहे. सोमवारी ते ही चाचणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना कोरोना चाचणीचा अहवाल पालिकेकडे द्यावा लागेल.

दरम्यान दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता अमिर खान यांच्यानंतर अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा मुंबईतील बंगला पालिकेकडून सील करण्यात आला आहे. त्याशिवाय रेखा यांच्या बंगाल्याच्या बाहेर पालिकेने नोटीसही जारी केली आहे.

त्यांचा बंगला वांद्रे येथील बॅडस्टॅंड भागात आहे. त्यांच्या घराची रक्षा करण्यासाठी कायम 2 सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेकडून रेखा यांचा संपूर्ण बंगला सॅनिटाईझ करण्यात आला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Rekha