• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • धक्कादायक! 38 वर्षीय अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू

धक्कादायक! 38 वर्षीय अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू

ही अभिनेत्री मागच्या काही काळापासून खूप आजारी होती आणि दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते.

 • Share this:
  मुंबई, 14 मार्च : अभिनेत्री रिना रावत हिचं वयाच्या 38 व्या वर्षी हार्टअटॅकनं निधन झालं आहे. रिना रावत ही उत्तराखंडची गाणी आणि सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. ‘पुष्पा छोरी…’ या गाण्यातील अभिनयामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिना यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला आहे. मागच्या काही काळापासून रिना आजारी होती. ‘पुष्पा छोरी...’ या गाण्याव्यतिरिक्त रिनानं ‘भग्यान बेटी’, ‘मायाजाल’, ‘फ्योंली ज्वान ह्वेगी’ या सुपरहीट गाण्यांमध्ये अभिनय केला होता. रिना रावतनं उत्तराखंडच्या काही दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं. ज्यात पन्नू गुंसाई, जयपाल नेगी, गीता उनियाल यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. 38 वर्षांच्या रिना यांनी कमी वयातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. याशिवाय तिनं कला आणि संस्कृतीच्या संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. Corona Positive अभिनेत्यानं शेअर केला पहिला फोटो, सांगितलं कसा देत आहेत लढा रिनासोबत अनेक व्हिडीओ अल्बममध्ये काम केलेल्या पन्नू गुंसाईनं फेसबुकवर पोस्ट करत आपलं दुःख व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं, आम्ही 10 दिवसांपूर्वीच भेटलो होतो. जुन्या आठवणी आठवून ती खूप हसत होती. कधी धर्मेंद्र चौहानला चिडवत असे कधी मला चिडवत असे. आम्ही एकत्र टीक टॉक व्हिडीओ तयार केले होते. पण तिच्या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. तु आमच्या आठवणीत नेहमीच राहशील. धावणाऱ्या हत्तीवर निर्दयीपणे चालवली गोळी, VIRAL VIDEO पाहून भडकला रणदीप हुड्डा दिल्लीच्या हॉस्पिटमध्ये रिनावर उपचार सुरू होते. 2005 मध्ये रिनाचं लग्न झालं होतं. तिला एक मुलगा सुद्धा आहे. तिचा पती दीपिक रावत एका सरकारी कार्यालयात काम करतो. 2000 पासून जवळपास 8-10 वर्ष रिना रावत उत्तराखंडच्या सिनेमांमधील आघाडीची अभिनेत्री होती. सासू पडली सुनेवर भारी! समीरा रेड्डीचा डान्स Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा
  Published by:Megha Jethe
  First published: