SHOCKING! अजय देवगणच्या प्रेमात वेड्या झालेल्या या अभिनेत्रीनं केला होता आत्महत्येचा प्रयत्न

SHOCKING! अजय देवगणच्या प्रेमात वेड्या झालेल्या या अभिनेत्रीनं केला होता आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता अजय देवगण काजोल आणि आपल्य मुलांसोबत खूश असला तरीही एकेकाळी त्याच्या अफेअरच्या खूप चर्चा झाल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : अभिनेता अजय देवगण काजोल आणि आपल्य मुलांसोबत खूश असला तरीही एकेकाळी त्याच्या अफेअरच्या खूप चर्चा झाल्या होत्या. तो ज्या अभिनेत्रीसोबत काम करत असे ती अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडत असे. अशीच एक अभिनेत्री होती रवीन टंडन. खरं तर सुरुवातीला अजय आणि रवीनाच्या लव्हस्टोरीकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. हा किस्सा त्यावेळचा आहे जेव्हा अजय आणि रवीना यांनी दिलवाले सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी रवीना अजयच्या प्रेमात वेडी झाली होती. त्यावेळी या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा मासिकांमध्ये छापल्या जात होत्या. पण त्याच वेळी अजय करिश्मा कपूर सोबर जिगर सिनेमाच्या शूटिंगमध्ये बीझी होता.

एकेकाळी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री रवीनानं आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त स्वतःचा वेगळा चाहता वर्गच निर्माण केला नाही तर उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे.  रवीनाला बॉलिवूडमध्ये जवळपास 27 वर्षं झाली आहेत. आज आपलं वैवाहिक जीवन शांतपणे घालवत असलेल्या रवीनाच्या आयुष्यात मात्र एकेकाळी बरीच वादळं येऊन गेली. सुरुवातीच्या काळात तिचं नाव अभिनेता अजय देवगणशी जोडलं गेलं होतं आणि रवीना सुद्धा अजयच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, तिनं त्यासाठी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.

जिगर सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजयचं सूत करिश्माशी जुळलं आणि त्यानं रवीनाचा हात सोडून करिश्माचा हात धरला. मात्र या सगळ्यामुळे रवीना डिप्रेशनमध्ये गेली होती. एवढंच नाही तर तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अजयनं यावर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रवीनाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं होतं. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ती हे सर्व करत असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

अजयच्या या प्रतिक्रियेवर रवीनाचं म्हणणं होतं की, अजयनं तिला लव्ह लेटर लिहिली आहेत आणि आता तो तिला फसवत आहे. त्यावर अजयनं रवीनाला मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे असं म्हटलं होतं. तसेच रवीना कधीच माझी मैत्रीण नव्हती किंवा मी कधीच तिच्यावर प्रेम केलं नाही. ती हे सर्व फक्त कल्पना करत आहे. असं त्यानं म्हटलं होतं. अजयचं हेही म्हणणं होतं की, रवीनानं माझ्या नावानं स्वतःच स्वतःला पत्र लिहिली आहेत.

अजयनं रवीनाला धमकी दिली होती की, जर तिच्यात हिम्मत असेल तर तिनं ही सर्व पत्र पब्लिश करावीत आणि जर ती माझ्यावर अशाप्रकारे आरोप लावणं सोडणार नसेल तर मी तिची अशी गुपितं उघड करेन की तिला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यानंतर रवीनाला अक्षय कुमारचा मोहरा सिनेमा मिळाला आणि त्याच्यासोबत काम करता करता ती त्याच्या प्रेमात पडली मात्र त्याचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही.

First published: February 16, 2020, 3:34 PM IST

ताज्या बातम्या