मुंबई, 14 जून : बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री रविना टंडन सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रिय आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची मतं बिनधास्त मांडताना दिसते. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे रविना सध्या खूप चर्चेत आली आहे. रविनानं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सिंहाच्या व्हिडिओवर राग व्यक्त केला आहे.
फिटनेस क्वीन दिशा पाटनीच्या घरी आला ‘नन्हा मेहमान’ सोशल मीडियावर फोटो व्हायरल
रविनानं सोशल व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला. या व्हिडिओमध्ये काही लोक एका सिंहाला त्रास देत आहेत. ते जबरदस्तीने त्या सिंहाच्या तोंडावर केक फासून त्यावर हसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रिट्वीट करत रविनानं लिहिलं, ‘हरलेल्या लोकांची दयनीय अवस्था. हे सर्व लोक नरकात जाऊन सडतील. अनेकदा मला वाटतं की, लोकांची कर्म कथा ‘नागिन’ सिनेमा प्रमाणे त्यांच्यासमोर याव्यात आणि त्यांचा भयंकर मृत्यू यावा.’
फॅनने विकीला पाहूनही दाखवली नाही ओळख, विकीने दिले सोशल मीडियावर उत्तर
Pathetic bunch of loser human b.... hope they Rot in hell. Sometimes I do wish karma takes the form like our own Nagin movie,watch these a... die a writhing torturous death. https://t.co/9S1qe67qTa
— Raveena Tandon (@TandonRaveena) June 12, 2019
रविना टंडनने शेअर केलेला हा व्हिडिओ आणि त्याची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिनं रिट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये काही तरुण एका सिंहाच्या तोंडवर केक फासून त्याला त्रास देताना दिसत आहेत आणि त्यावर हसत आहेत. त्यानंतर तो सिंह निघून जाताना दिसत आहे.
रविना टंडन सध्या सिल्व्हर स्क्रिन पासून दूर आहे. पण तिनं तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. 'पत्थर के फूल', 'अक्स', 'सत्ता', 'लाडला', 'दमन' आणि 'बड़े मियां-छोटे मियां' यासारख्या सिनेमामध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसली आहे.
VIDEO- क्रिकेट ग्राउंडवर रणवीर गाळतोय घाम तर दीपिका इन्स्टाग्राममध्ये बिझी