मुंबई, 24 मार्च : बॉलिवूड कलाकारांची त्यांच्या सिनेमांमुळे, अभिनयामुळे चर्चा असतेच. पण त्यांच्या कामापेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सर्वाधिक पाहायला मिळते. त्यातही अफेअर्स, लग्न, घटस्फोट प्रकार बॉलिवूड कलाकारांमध्ये सर्सार सुरू असतात. अनेक कलाकार आहे ज्यांनी 1-2 हिट सिनेमात आपलं नाव कमावलं. कामा सहीत त्यांचं वैयक्तिक आयुष्य चांगलंच चर्चेत आलं आणि त्यानंतर मात्र या कलाकारांनी बॉलिवूडला रामराम ठोकला तो कायमचाच. 80च्या दशकातील अशीच एक अभिनेत्री जिनं बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. जिचं नाव राजश्रीसारख्या प्रोडक्शन हाऊसबरोबर जोडलं गेलं. सलग हिट सिनेमे तिच्या पदरात पडले पण तिच्या आयुष्यात असं काही घडलं की संपूर्ण करिअरलाच ब्रेक लागला.
आज जाणून घेऊया अभिनेत्री रंजीता कौरच्या आयुष्याबद्दल. दिसायला सुंदर, देखणी, तिच्या तीक्ष डोळ्यांनी तिनं हजारो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पुणे फिल्म इन्स्टीट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घेऊन अभिनयातील बारीक सारीक गोष्टींवर कमांड असलेली रंजीता कौर करिअरच्या सुरूवातीलाच यशस्वी अभिनेत्री म्हणून समोर आली.
हेही वाचा - वडिलांनंतर नवऱ्यानं सोडली साथ; मुलांनीही फिरवली पाठ, अभिनेत्रीनं बालपणापासून सोसलं दु:ख
'तराना' आणि 'सुरक्षा' सारख्या हिट सिनेमाबरोबरही रंजिताचं नाव जोडलं गेलं. सिनेमाबरोबरच रंजिताचं नाव अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर देखील जोडलं गेलं. त्या वेळेस अभिनेत्रीचं करिअर पिकवर होतं. पण मिथुन चक्रवर्तीबरोबर नाव जोडलं जाताच अभिनेत्रीचं करिअर लयाला जाण्यास सुरूवात झाली. तिचे पुढील अनेक सिनेमे फ्लॉप झाले. त्याकाळात रंजिता फार चिडचिडी झाली होती असं म्हणतात.
90च्या दशकात रंजिताचं करिअर ज्या वेगानं यशाच्या शिखरावर पोहोचलं त्याच वेगानं ते खाली ठासळलं. त्यानंतर तिनं इंडस्ट्री सोडण्यात धन्यता मानली. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजेच 2005मध्ये तिनं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. याआधी रंजितानं सिनेमा बोल्ड सीन्स करण्यास नकार दिल्यानं तिला सिनेमात घेण्यासाठी नकार देण्यात आला. 15वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर आल्यानंतर रंजिता काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. त्यानंतर तिनं कायमचाच बॉलिवूडला रामराम ठोकला.
अभिनेत्री रंजिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. मिथुन चक्रवर्तीबरोबर नाव जोडल्यानंतर तिनं राज मसंदबरोबर लग्न केलं. राजनं अभिनेत्रीवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. इतकंच नाही तर रंजिताने नवरा राज मसंदला बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील तिच्यावर करण्यात आला होता. राज आणि तिला एक मुलगा होता. मुलीवरुन दोघांमध्ये अनेक वाद होते. राज मुलाला पैसे देण्यास नकार देत असल्यानं रंजिता नाराज होती. हा कौटुंबिक वाद पुढे सोडवला गेला.
अभिनेत्री रंजितानं बॉलिवूडला 'अंखियों के झरोखे से', 'सुरक्षा', 'तराना', 'हमसे बढ़कर कौन', 'सत्ते पे सत्ता, सारखेअनेक हिट सिनेमे दिले. पण सध्या अभिनेत्री या सगळ्यापासून अलिप्त झाली आहे. बॉलिवूडशी तिनं काहीच संबंध ठेवला नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News