मुंबई, 22 डिसेंबर: ड्रग केसमध्ये अडकलेल्या रकुलप्रीत सिंहवर (Rakul Preet Singh) आता नवं संकट आलं आहे. रकुलप्रीत सिंहची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. तिने स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. तसंच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन तिने आपल्या तब्येची माहिती दिली.
रकुलप्रीत सिंहची पोस्ट
रकुलप्रीतने पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी माझी काळजी घेत आहे. खबरदारी म्हणून मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी. मी लवकरच शूटिंगला सुरुवात करेन.’ रकुलप्रीतने तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच ती मालदीववरुन परतली होती. तिचे मालदीवचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिची कोरोना चाचणी झाली होती. त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.
रकुलप्रीतच्या हातात सध्या मेडे (MayDay) हा चित्रपट आहे. लवकरच ती शूटिंगला सुरुवात करणार होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि अजय देवगणही झळकणार आहेत. पण त्यातच तिला कोरोना झाल्यामुळे शूटिंग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी रकुल प्रीतवर ड्रग्जचं सेवन करण्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे ती ट्रोलही झाली होती.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.