मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘एकेकाळी खायला अन्न नव्हतं अन् राहायला छत’; राखीला आठवला गरीबीचा काळ

‘एकेकाळी खायला अन्न नव्हतं अन् राहायला छत’; राखीला आठवला गरीबीचा काळ

rakhi

rakhi

आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळं लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारी राखी सावंत सध्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. बिग बॉसच्या 14 व्या पर्वात तिनं वाईल्ड कार्डद्वारे चॅलेंजर म्हणून प्रवेश केला आणि अल्पवधीतच तिनं सगळ्या स्पर्धकांना मागं टाकत आपलं स्थान पक्कं केलं.

पुढे वाचा ...

    मुंबई, 20मार्च: आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळं लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारी राखी सावंत (Rakhi sawant) सध्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे (Big Boss Reality Show) पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. बिग बॉसच्या 14 व्या पर्वात तिनं वाईल्ड कार्डद्वारे (Wild Card) चॅलेंजर म्हणून प्रवेश केला आणि अल्पवधीतच तिनं सगळ्या स्पर्धकांना मागं टाकत आपलं स्थान पक्कं केलं. या आधी 2006मध्ये हा शो पहिल्यांदा सुरू झाला तेव्हादेखील ती या शोमध्ये सहभागी झाली होती.

    आपल्या हॉट आयटम डान्समुळं एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी राखी सावंत अलिकडे बेछूट वक्तव्यांमुळे लक्ष वेधून घेत होती. मात्र आता बिग बॉसच्या घरातील ती सर्वाधिक मनोरंजन करणारी स्पर्धक आहे. तिच्या जुलीच्या अवतारानं या शोचा होस्ट सलमान खान देखील (Salman Khan) प्रभावित झाला आहे. राखी सावंतची आई (Mother) सध्या कॅन्सरनं (Cancer) आजारी असून, तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्यानं राखी या शोमध्ये सहभागी झाली. तिच्या या शो मधील कामगिरीनं तिनं प्रेक्षकांनाही थक्क केलं असून, पुन्हा तिची लोकप्रियता वाढीला लागली आहे.

    राखी हॉस्पिटलमध्ये आईची काळजी घेतानाही दिसते. तिला सलमान आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनी आर्थिक मदत देऊ केली असून, तिचे इंडस्ट्रीमधील सहकलाकार, मित्र मैत्रिणी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची भेट घेतली आणि तिच्या आईची विचारपूस केली.

    या  तिला मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळं, चाहत्यांच्या प्रेमामुळं राखी अतिशय भारावली असून, अतिशय भावूक होत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, आता हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतं. हे खरचं आहे नां, अशी शंका येते. आता मी जिममधून बाहेर पडत असताना दिसले किंवा कुठे बाहेर, दिसले की लोक थांबतात, माझ्याशी बोलतात, माझ्याबरोबर फोटो काढून घेतात. फोटोग्राफर्सही फोटो काढतात.

    (हे वाचा: ग्लॅमरस अभिनेत्री शेतात चालवतेय नांगर; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क  )

    पण एक काळ असा होता जेव्हा लोक मी दिसले तरी कोणी लक्ष देत नसे. माझ्या रुपाबद्दल, जाडेपणाबद्दल चेष्टा करत. मला इंग्लिश बोलता येत नाही म्हणून माझी चेष्टा करायचे. पण मी ज्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून माझं ध्येय साध्य केलं आहे, याची कल्पना लोकांना नाही म्हणून ते असं बोलतात. याची मला कल्पना आहे. या कटू आठवणी विसरणं कठीण आहे; पण लोक आता देत असलेल्या प्रेमामुळं त्या सुसह्य झाल्या आहेत.’ बिग बॉसमुळं तिला पुन्हा तिची प्रतिमा नव्यानं निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल तिनं विरल भायानी, सलमान खान आणि विकास गुप्ता यांच्यासह चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Rakhi sawant